पिंगळसई गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव देशमुख यांचे निधन

कै. अंकुशराव देशमुख 

कोलाड नाका (शरद जाधव)रोहा तालुक्यातील पिंगळसई गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुशराव बाळकृष्ण देशमुख यांचे नुकतेच वृध्दपकालाने निधन झाले. मृत्यू समयी   ते 93 वर्षाचे होते.

            पिंगळसई गावचे राजकीय अधारस्तंभ, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनंतराव देशमुख यांचे ते वडिल होते  अंकुशराव देशमुख यांना समाजकारणाची विशेष आवड होती. त्याकाळात धामणसई विविध कार्यकारी सोसायटीवर 10 वर्ष चेरमन पदावर होते त्यामूळे शेतकरी वर्गाला ते नेहमी सहकार्य करित होते .परिसरात एक सृजनशील व्यक्त्तीमत्व म्हणून परिचीत  होते.

     स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे यांच्याशी त्यांची  विशेष जवळीकता होती.अणि आजही त्यांचे चिरंजीव तटकरे परिवाराशी स्नेह संबंध जपुन आहेत . शेवटच्या क्षणापर्यन्त अंकुशराव देशमुखांची सेवा  त्यांच्या मुलांनी उत्तमरित्त्या केली .त्यांच्या  अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय जमला होता .त्यांच्या मागे  2 मुले 4 मुली, सुना , नातवंडे,असा मोठा परिवार आहे. दशक्रियाविधी गुरवार दिनांक. 5 मे रोजी तर उत्तरकार्य रविवार दिनांक 8 मे रोजी राहत्या घरी पिंगळसई येथे आयोजित केले आसल्याची माहीती त्यांच्या परिवाराकडून देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog