जय भवानी पतसंस्थेचा वर्धापनदिन सोहळा संपन्न

कोलाड (श्याम लोखंडे )सहकार क्षेत्रात अग्रगन्य असलेल्या जय भवानी पतसंस्था रोहा चा 27 वा वर्धापनदिन सोहळा संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला . 

यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष पी. बी सरफळे  उपाध्यक्ष शंकरराव भगत. संचालक मनोहर मेहत्तर, विनायक पवार. रामशेट कापसे, सुहास खरिवले महेश बामूगडे,दिपक जाधव,मनोहर सकपाळ, वेवस्थापिका बंदींनी धनावडे, निता सिंगृत, आदी मान्यवर उपस्तीत होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष पी.बी सरफळे यानी गेली 27 वर्ष संस्था उभी करताना संचालक मंडळ कमेटी ला किती मेहनत घ्यावी लागली. याची उदाहरने देत संस्थेच्या कार्याचा लेखाजोगा मांडला. तर पतसंस्था चालवने, टीकवने,जिकरिचे असते. कारण आर्थिक वेवहार त्या ठिकानी असते. वसुली हा पतसंस्थेचा कणा असतो. जय भवानी पतसंस्थेचा कारभार हा गेली 27 वर्ष पारदर्शक आहे.या संस्थेच्या माध्यमातून.अनेक गरजू आर्थिक दुर्बल घटकाना पतपुरवठा केला आहे. ज्यावेळी कर्जदार अम्हाला येऊन सांगतात की चेरमन साहेब माझी मुल  पतसंस्थेने अर्थसहाय्य  केले म्हणून  शिकली.  आम्ही घर बांधले, वेवसाय उभा केला. हे जेव्हा सभासद सांगतात त्यावेळी 27 वर्ष केलेल्या कामाचे चिज झाल्यासारखे वाटते. व यासाठी सर्व संचालक मंडळा च्या व कर्मचारी वर्गाच्या सहकार्या मुळे शक्य झाल्याचे  अध्यक्ष सरफळे यानी सांगितले तर 1995 ला लावलेल्या या छोट्याश्या रोपट्याचे  वठवृक्ष होत असताना दिसत असल्याचेही सरफळे यानी सांगितले 

      यावेळी 15 वर्ष बचत प्रतिनिधि म्हणूण प्रमाणीक  काम केलेले कोलाड चे  सहदेव होडबे यांचा सत्कार संस्थेच्या वतिने करण्यात आला.तर उपस्तीथ सर्वाचे आभार मनोहर मेहत्तर यानी मांडले.

Comments

Popular posts from this blog