श्री. संताजी जगनाडे महाराज मंदिर १३ वा वर्धापन सोहळा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.

 श्री संताजी जगनाडे महाराज

सुतारवाडी : (हरिश्चंद्र महाडिक) तमाम तेली बांधवांचे आराध्य दैवत श्री. संताजी जगनाडे महाराज यांचे रायगड जिल्हयातील ऊसर (बुद्रुक) ता. माणगाव, जि. रायगड येथील बांधलेल्या मंदिराचा १३ वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. २२ मे २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने परिवारासह वेळेवर उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन असे अध्यक्ष श्री. वसंत कुशाबा निगडे आणि सचिव श्री. चंद्रकांत राम निगडे तसेच सर्व सभासद बंधू-भगिनींने केले आहे. हे मंदिर बांधल्या पासून गेली १३ वर्षे सातत्याने (कोरोना कालावधी सोडून) विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

        यावर्षी ही सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहात मंदिराचा १३ वा वर्धापन दिन साजरा करणार असून दि. २२ मे २०२२ रोजी सकाळी ९ ते १०.३० श्री. सत्यनारायणाची पूजा सकाळी १०.३० ते १२.३० प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री. संताजी जगनाडे महाराज पादुका मिरवणूकसह पालखी सोहळ्याला सुरुवात दुपारी १२.३० ते २, महाप्रसाद दुपारी २ ते ३ प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार समारंभ दुपारी ३ ते ४ महिलांचा हळदी कुंकू समारंभ, रात्री ९ वा. ऊसर बुद्रुक ग्रामस्थ मंडळाचा सस्वर भजन कार्यक्रम आदि कार्यक्रम संपन्न होणार असून या कार्यक्रमास मा. गजानन शेलार साहेब कोषाध्यक्ष म.प्रा.तै. महासभा, मा.डॉ. भूषणजी कर्डिले साहेब महासचिव म.प्रा.तै. महासभा, मा.डॉ. सतिश वैरागी साहेब अध्यक्ष को विभाग म.प्रा.तै. महासभा, मा. संतोष पोटे कार्याध्यक्ष रा. जि. तै. महासभा, मा. सिद्धांत शेलार युवा अध्यक्ष रा. जि. तै. महासभा, मा. प्रथमेश काळे युवा सचिव रा. जि. तै. महासभा, मा. अजितशेट तार्लेकर नगरसेवक माणगाव नगरपंचायत, मा. सुनिल शेट राऊत उद्योजक पाली, मा. संतोष रटाटे अध्यक्ष रा.जि को. ते स.सं. मा. संतोष भोज उपाध्यक्ष रा. जि. तै महासभा, मा. गजानन शेलार उपाध्यक्ष को. विभाग म. प्रा.तै. महासभा, मा. जितेंद्र लोखंडे अध्यक्ष पेण तालुका, मा. रविंद्र निगडे अध्यक्ष म्हसळा श्रीवर्धन, मा. किशोर किवे अध्यक्ष महाड पोलादपूर आदि प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. १३ वा वर्षापन दिन यशस्वीपार पाडण्यासाठी अध्यक्ष कार्याध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष, उपकार्याध्यक्ष, उपसचिव, सहखजिनदार तसेच हिशोब तपासणीस, मंदिर देखभाल प्रमुख तसेच सर्व सल्लागार विशेष मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog