पालीत आदिवासींनी केला ऐतिहासिक कार्यक्रम.प्रथमच साजरी केली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती,

दिनेश कातकरी आदिवासींची बुलंद तोफ यांचे लाभले मार्गदर्शन

गोवे -कोलाड ( विश्वास निकम ) पाली आदिवासी कातकरी समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाली मध्ये प्रथमच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदिवासी कातकरी समाज हॉल पाली सुधागड येथे साजरी करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आदिवासी कातकरी समाज कधीच करत नाही हा प्रथमच प्रयत्न असल्यामुळे सदरचा जयंतीचा कार्यक्रम हा ऐतिहासिक कार्यक्रम असल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. सदरच्या ऐतिहासिक आदिवासी कार्यक्रमाबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर या आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पाली सुधागड तालुक्याचे तहसीलदार दिलीप रायन्नावार लाभले होते. त्यांचे मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, उपेक्षित लोकांकडून ही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. प्रथम जयंती साजरी करून आपण मोठे काम केलेले आहे. उद्धारली कोटी कोटी कुळे, भिमातुझ्या जन्मामुळे. आपण कातकरी समाजाने चांगली सुरुवात केलेली आहे. बाबासाहेबांचे विचार समतावादी, मानवतावादी, सर्वसमावेशक आहेत. सर्व धर्म समभाव त्यांचे विचार वाचले पाहिजे,अंगीकारले पाहिजे. शिक्षणाच्या बाबतीत कातकरी समाजाने काम करणे आवश्यक आहे. समाज बदलायचा असेल तर कातकरी समाजाने स्वतः बदलायला पाहिजे. शासन तयार आहे मदत करायला. आपण कमी पडतो, आपला समाज गावापासून दूर असतो,धंद्यावर जातो.माझ्या वडिलांनी मला शाळेत जबरदस्तीने बसवलं. सिद्धेश्वर वाडी ची पोर खेळात किंवा इतर मध्ये हुशार आहेत. निश्चय करूया. मलाही बरं वाटतंय. ग्रंथालय चालू करायचं आहे.तीन मुलांच लाॅ मध्ये ऍडमिशन केलय. येणारी प्रत्येक मुलं कमाल करतील.खूप खूप धन्यवाद,मला आपण इथ बोलवलंत.

पुढे आदिवासी कातकरी समाजाची बुलंद तोफ म्हटले जाणारे बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश देवराम कातकरी यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की, पाणी पिण्याचा अधिकार कुत्र्यांना,मांजरांना,गुरांना होता परंतु माणसाला नव्हता. आदिवासींनाही पाणी पिण्याचा अधिकार नव्हता.तो पाणी पिण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी समाजाला दिलेला आहे.तसेच संविधानातील कलम १४,१५,२१,४५,४६,३४२ आणी आदिवासी समाजाला दिलेला विशेष अधिकार ५वी आणि ६वी अनुसूचि याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच पुढे ते म्हणाले की, ज्या ज्या महापुरुषांनी आदिवासी समाजावर उपकार केले आहेत त्या त्या महापुरुषांची जयंती आदिवासी कातकरी समाजाने साजरी केली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली पाहिजे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली पाहिजे, ते जर नसते तर आपल्या मुली चूल आणि मूल इथंपर्यंतच मर्यादित असत्या तसेच भारतात होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांनी फक्त एकाच जातीसाठी काम केल नाही यामुळे त्यांना जातीच्या बंधनात अडकवून ठेवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व महापुरुषांच्या जयंत्या आदिवासी समाजाने साजऱ्या करायला पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाली तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ गोळे यांनी केले, सूत्रसंचालन करताना त्यांनी अनेक प्रकारे आदिवासी कातकरी समाजाला योग्य मार्गदर्शन केले.शेवटी पाली सुधागड तालुक्याचे कातकरी समाजाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत वाघमारे यांनी अध्यक्षपर भाषणात सांगितले की, आदिवासी कातकरी समाजाने प्रथमच आंबेडकरांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला,आमच्याकडे वेळ कमी होता परंतु कृष्णा भाऊ वाघमारे, माजी अध्यक्ष लक्ष्मण पवार, विश्वास भोय, मोहन हीलम,संतोष वाघमारे, परली विभागअध्यक्ष दगडू हिलम, शिळोशी येथील सामाजिक कार्यकर्ते शरद भाऊ गोळे या सर्वांनी विशेष सहकार्य आणि मनापासून मेहनत केल्याने सदरचा कार्यक्रम यशस्वी होताना दिसत आहे. काही लोकांचा विरोध होता परंतु बर्‍यापैकी उपस्थिती जमलेली आहे,आज जरी आम्ही गरीब असलो तरी आम्हाला इतिहास समजत आहे कारण थोडेफार का होईना आमचे लोक आता शिकलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात ज्यांनी ज्यांनी आम्हाला आधार दिला होता त्या सगळ्या महामानवांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करू.शेवटी अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे साहेब यांनी मान्यवरांचे आणि उपस्थित समाजाचे मनापासून आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Comments

Popular posts from this blog