गोवे-खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा मानाचा चषक जय बजरंग हेटवणे संघानी पटकवला

  गोवे-कोलाड (विश्वास निकम ) खा. सुनिल तटकरे,राज्यमंत्री तथा रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने व रोहा तालुका समन्वय समिती सदस्य राकेश शिंदे, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विनोद भाऊ पाशिळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोवे-खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशचा मानाचा चषक संभे येथील क्रिडांगणावर आयोजित करण्यात आला.या स्पर्धेत जय बजरंग हेटवणे संघाने उत्तम कामगिरी करीत प्रथम क्रमांक प्राप्त करून मानाचा चषक पटकावला.

         तर गावदेवी गावठाण महादेववाडी संघ द्वितीय, क्षेत्रपाळ पुई संघ तृतीय, तर श्री गणेश गोवे संघ चतुर्थ क्रमांकांचे मानकरी संघ ठरले.तर सामनावीर महादेववाडी संघाचा प्रतिक तिलटकर, उत्कृष्ट फलंदाज हेटवणे संघाचा देवेश वालंज, उत्कृष्ट गोलंदाज पुई संघाचा सामी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण श्री.गणेश गोवे संघाचा सार्थक दहिंबेकर तर पब्लिक हिरोचा किताब शिवशंभो गोवे संघाचा धनाजी शिगवण याला देण्यात आला.



       या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस समारंभ आ. अनिकेत तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी राकेश शिंदे रोहा तालुका समन्वय समिती सदस्य, विनोद पाशिलकर रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष,जयवंत मुंडे रोहा तालुका युवक अध्यक्ष,नरेंद्र जाधव खांब विभागीय अध्यक्ष,महेंद्र पोटफोडे आदर्श सरपंच गोवे,सुरेश महाबळे सरपंच आंबेवाडी,वसंत भोईर रायगड भुषण तथा आदर्श सरपंच देवकान्हे,महेश पवार, संजय मांडळुस्कर,नितीन जाधव,संदीप जाधव,रविंद्र सागवेकर, राकेश कापसे,दिवाण सानप, डॉ. मंगेश सानप, रुपेश सानप,रुपेश महाबळे, महेंद्र जाधव,अनिल निकम,संभे पोलीस पाटील अनंत सानप व असंख्य मान्यवर उपस्थित होते.

               सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी गोवे-खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव,सचिव शरद वारकर, सह सचिव रुपेश धनवी, खजिनदार महेश चितळकर,उप खजिनदार महेश बामणे, माजी अध्यक्ष प्रवीण धामणसे व सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog