आदर्शगाव भातसई येथील श्री महादेवी मातेचा १५ एप्रिल पालखी सोहळा १६ एप्रिल रोजी यात्रा उत्सव!

   सर्वत्र भक्तीमय वातावरण!

कोलाड (श्याम लोखंडे ) भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी रोहा तालुक्यातील आदर्शगाव भातसई येथिल श्री महादेवी मातेचा पालखी व यात्राउत्सव शुक्रवारी १५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पालखी मिरवणुकीला भातसई गावातुन येशीच्या मंदिरातुन सुरुवात होणार आहे. पालखी नतंर झोलांबे कोपरे या गावात जाते.त्यानंतर पालखी झोलांबे गाव ,लक्ष्मीनगर आदी ठिकाणी मिरवणूक करत सायंकाळी ७ वाजता आदर्शगाव भातसई गावातील भक्तगणांच्या घरोघरी भक्तीमय वातावरणात या महादेवीची पूजा करत मंदिरात येते.  

तर दुस-या दिवशी शनिवारी १६ एप्रिल रोजी महादेवी मातेचा यात्राउत्सवाला सुरुवात होणार असून सकाळ पासुनच या ठिकाणी भक्त आपली मनोकामना पूर्ण झाल्याने नवस घेऊन मंदिरात वाजत गाजत हजेरी लावतात . रोहा तालुका तसेच रायगड जिल्ह्यातुन भक्तगणांचे अलोट जनसागर या महादेवी आईच्या यात्रेमध्ये सहभागी होतात. यात्रेचा मुख्य कार्यक्रम म्हणजे येथे आजही देवीचा पुजारी याला गळ लावून प्रदक्षिणा घातली जाते.

 यावर्षीचा गळ सायंकाळी ५-३० वाजता सुरुवात होणार आहे. एकूण सहा भक्ताना येथे गळ लावले जातात. त्यांपैकी एक भक्तांचा वरचा गळ लाटेला लटकवून एक फेरी फिरवली जाते.सदरच्या या भक्तिमय उत्साहला निडी,कोपरे,झोळांबे लक्ष्मीनगर,वरवडे पाले तर्फे अष्टमी, आरे बुंद्रुक, शेजारी गांवातील मानाच्या काट्या येतात.

तर या पालखी व यात्रा उत्सवासाठी भाविकांनी उपस्थीत राहावे असे आग्रहच निमंत्रण आदर्श गाव भातसई, यात्रा उत्सव कमेटीने केली आहे.

Comments

Popular posts from this blog