पुगांव येथे पंचायत राज दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुगांव-खांब (नंदकुमार कळमकर )रोहा तालुक्यातील पुगांव येथे सालाबाद प्रमाणे २४ एप्रिल २०२२ रोजी 'पंचायती राज दिन' ग्रामपंचायत पुगाव येथे साजरा करण्यात आला.या अगोदर केंद्र व राज्य शासनानी ११ ते १७ एप्रिल २०२२ हा सप्ताह आयकॉनीक सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये ग्रामपंचायत पुगांव येथे शाश्वत विकास ध्येयांच्या बालस्नेही गाव,जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव या संकल्पना निवडले आहेत त्यावर ग्रामपंचायत वर्षभर काम करणार आहे त्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पुगाव यांनी रा.जि.प. केंद्र शाळा पुगाव येथे पोस्टर, निबंध, वकृत्व स्पर्धाचे आयोजन केले होते त्यामध्ये काही विध्यार्थी नी बाल स्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव विषयांवर पोस्टर तयार केले होते काही विध्यार्थीनी निबंध व वकृत्व स्पर्धेत भाग घेतला होता.या स्पर्धेत १ ते ३नंबर आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवार दि.२४ एप्रिल २२ रोजी सत्कार करण्यात आला यावेळी वक्तृत्व स्पर्धेत मुग्धा चंद्रकांत अधिकारी प्रथम इयत्ता २री, स्वरा मधुकर कळमकर द्वितीय इयत्ता ३ री, शुभ्रा उमेश तळकर तृतीय इयत्ता २री,निबंध स्पर्धेत अक्षरा नंदकुमार कळमकर प्रथम इयत्ता ३री, अथर्व श्रीकांत दिघे द्वितीय इयत्ता ४ थी, ज्ञानेश्वरी सुबोध देशमुख तृतीय इयत्ता ४थी,पोस्टर स्पर्धेत प्रज्वल बबन येलकर प्रथम इयत्ता ३री, अदिती प्रमोद देशमुख द्वितीय इयत्ता ४ थी, जय गणेश सुतार तृतीय इयत्ता ४ थी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत पुगाव सरपंच नेहाताई म्हसकर,उपसरपंच राम धुपकर,सदस्य गणेश म्हसकर, नारायणराव धनवी जेष्ठ नेते, बबन म्हसकर, विश्वनाथ आधिकारी,विठ्ठल येलकर गुरुजी, केशव आधिकारी, वैदेही तळकर नीळकंठ कदम शिक्षक, म्हात्रे ग्रामसेविका,सुरेश घोगले,आनंता घोगले शिपाई,असंख्य ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पुगाव यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment