चिल्हे गावचे सामाजिक कार्यकर्ते शांताराम लोखंडे यांचे दुःखद निधन
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील कृषिनिष्ठ शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते शांताराम तुकाराम लोखंडे यांचे 13 एप्रिल रोजी वयाच्या 76 व्या वर्षी दुःखद निधन झाल्याने लोखंडे कुटूंबियांवर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे .
शांताराम लोखंडे हे शेतकरी कुटूंबात जन्माला आलेले आई वडील व कुटूंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी मुबंईत मिळेल ती चाकरी केली अत्यंत मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचे लोखंडे यांनी आई वडिलांच्या पश्चात वडिलोपार्जित शेतीत लक्ष केंद्रित करत सह पत्नीक भात शेती लागवड करत असत कष्टाने आणि मेहनतीने आपल्या कुटूंबाचा व मुलांचा संभाळ करत मुलांना उच्च शिक्षण दिले गावासह परिसरात ते शांताराम पाटील म्हणूनच सुपरिचित होते असे लोखंडे यांचे आकस्मित निधन झाल्याने सर्वत्रच दुःख होत आहे
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांचे नातलग तसेच हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवर आदी चिल्हे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, भाऊ, बहीण, पुतणे, सुना , नातवंडे, पतवंडे असा मोठा लोखंडे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवारी 22 व उत्तरकार्य तेरावे सोमवारी 25 एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार आहेत.
Comments
Post a Comment