कु.डॉक्टर प्रेमळ मुसळे हिचा रायगड जिल्हा भोई समाजा तर्फे सन्मान

 गोवे-कोलाड(विश्वास निकम)रोहा तालुक्यातील गोवे गावची सुकन्या कु.डॉक्टर प्रेमळ सुरेश मुसळे हीने (बि.ए.एम.एस.मुंबई )ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे तिचा रायगड जिल्हा भोई समाजा तर्फे सन्मान करण्यात आला.

             रायगड जिल्हा भोई समाज सेवा संस्था यांची ६२वी. वार्षिक परिषद व १७ वी वार्षिक अहवाल सभा शनिवार दि.८ जानेवारी २०२२ रोजी रोहा तालुक्यातील म्हस्करवाडी येथे संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर मधुकर कनोजे व कार्यक्रमाचे उदघाटक खा. सुनिलजी तटकरे हे होते.या कार्यक्रमात गोवे गावची सुकन्या व सध्या ठाणे येथे राहणारी कु. प्रेमळ सुरेश मुसळे ही बी.ए.एम.एस.मुंबई ही पदवी घेऊन डॉक्टर झाल्यामुळे म्हस्करवाडी येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

         या कार्यक्रमाचे उदघाटक खासदार सुनिलजी तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि भोई समाज सेवा संस्था या समाजाचे कार्य दिवसेंदिवस प्रगती पथावर जात असून या समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहे व आम्ही ही कोठे कमी नाही हे एका खेडेगावातील मुलगी प्रेमळ सुरेश मुसळे  डॉक्टर होऊन हे सिद्ध केले आहे.तिच्या या जिद्दीचे कौतुक करावे हे थोडे आहे.यावेळी कोलाड परिसरातील राष्ट्रवादी पक्षाचे सरपंच,उपसरपंच,सदस्य युवा कार्यकर्ते तसेच भोई समाजाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व रायगड जिल्ह्यातील असंख्य भोई समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog