सुतारवाडी येथे एम . एस . इंटरप्रायझेस आणि सुरज बिल्डर्स च्या कार्यालयाचे उद्घघाटन


  सुतारवाडी ( हरिश्चंद्र महाडिक) मंगेश श्रीकांत सरफळे, आणि  दिलीप उमाजी जांभळे यांच्या एम. एस. इंटरप्रायझेस आणि सुरज बिल्डर्स च्या सुतारवाडी नाक्यावरील कार्यालयाचे उद्घघाटन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

       या वेळी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, सौ. वरदाताई सुनिल तटकरे, येरळ सरपंच सौ. विमल चिंतामण दळवी, जामगाव सरपंच सौ. दर्शना म्हशिलकर, कुडली सरपंच सौ. अश्विनी कामथेकर, सुतारवाडी महिला तसेच विविध परिसरांतील महिला कार्यकर्ते, उद्योजक, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.     

          सुरुवातीला सौ. शोभा मंगेश सरफळे यांनी मान्यवरांचे औक्षण केले. त्यानंतर कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले. सुतारवाडी नाक्यावर श्री. मंगेशशेट सरफळे यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या हळदीकुंकू कार्यक्रमात पंचक्रोशितील महिला उपस्थित होत्या. त्यांना भेटवस्तू देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. या वेळी उपस्थित पंचक्रोशितील महिलांनी मास्कचा वापर केला होता. 

      सुतारवाडी नाका आता प्रगती पथावर असून विविध प्रकारच्या दुकानांनी सजत आहे. एम.एस. इंटर प्रायझेस आणि सुरज बिल्डर्स च्या नुतन कार्यालयामुळे विविध प्रकारची कामं सुकर होणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. शोभा मंगेश सरफळे, मंगेश सरफळे, राजूबुवा दळवी , रविंद्र मामलुसकर तसेच मंगेश सरफळे मित्र परिवाराने खूपच मेहनत घेतली.


Comments

Popular posts from this blog