वरसगाव ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत सापया वरसगाव आघाडीच्या सौ. पूनम आंब्रूस्कर विजयी

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील नामवंत समजल्या जाणाऱ्या वरसगाव ग्राम पंचायत मध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत सापया ग्राम विकास व शिवसेना, भाजप, शेकाप , आघाडीच्या सौ पुनमताई अजित आंब्रूस्कर ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत.

वरसगाव ग्राम पंचायतीतील प्रभाग क्रमांक एक चे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार सीताराम बागुल यांचे निधन झाल्याने या जागेवर 18 जानेवारी 2022 रोजी पोटनिवडणुक घेण्यात आली या करिता राष्ट्रवादीकडून विजय मधुकर बागुल यांच्या विरोधात आघाडीच्या उमेदवार माजी उपसरपंच अजित आंब्रूस्कर यांच्या पत्नी सौ पूनम आंब्रूस्कर यांच्यात ही चुरशीची निवडणूक झाली होती या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारी रोजी हाती आला असून यात सापया वरसगाव गाव विकास आघाडी व शिवसेना ,भाजप, शेकाप आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ पूनम आंब्रूस्कर यांनी विजय बागुल यांचा पराभव करत भरघोस मतांनी विजयी निवडून आल्या आहेत ,

ग्राम विकासाचे शिलेदार कोकण विकासाचे भाग्यविधाते रायगड रत्नागिरी चे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांच्या बालेकिल्ला व लाखोंची विकास कामे केलेल्या वरसगाव ग्राम पंचायतीत सदरच्या झालेल्या ग्राम पंचयात पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराची पिछेहाट झाली याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे सर्वत्र बोलले जात आहे ,

संपन्न झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवार सौ पूनम अजित आंब्रूस्कर या भरघोस मतांनी निवडून आल्याने त्यांचे कोलाड आंबेवाडी नाक्यावरील कै. द.ग.तटकरे चौकात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत करत अभिनंदन करून त्यांना रोहा तालुका शिवसेनाप्रमुख समीर शेडगे,उपतालुकप्रमुख चंद्रकांत लोखंडे,माजी पं. सं. सदस्या सौ चेतनाताई लोखंडे,संभे ग्राम पंचायत सरपंच समीर महाबळे,गणेश शिंदे,कुलदीप सुतार, संजय लोटणकर, रविंद्र तारू,वरसगाव ग्रामस्थ आदींनी त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या .

Comments

Popular posts from this blog