रोहा महीला मंडळ अध्यक्षपदी शैलजा देसाई यांची सर्वानुमते निवड       

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा अष्टमी शहर महीला मंडळा ची जनरल सभा१०जानेवा री२०२२ रोजी रोहा येथील महीला उद्योग समीतीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरच्या सभेत शैलजा सुभाष देसाई यांची रोहा महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.              

यावेळी अध्यक्ष म्हणून शैलजा देसाई,कार्यकारी मंडळाच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांसमावेत ज्योती सनलकुमार उपाध्यक्ष. साधना जोशी सचीव, वंदना राजे,दिपा भिलारे. नेहा कुलकर्णी,आरती धारप,सरला पाटील,श्रद्धा सकपाळ,निशा शिंदे, संगीता वेदपाठक या सर्वाची सर्व महिला मंडळांच्या वतीने यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आल्या.      

नवनिर्वाचित अध्यक्षा शैलजा देसाई यांनी यापूर्वि शासनाच्या महसुल खात्यात३०नोव्हें.२०१२ पर्यंत ३० वर्षे प्रामाणिक व सचोटीने काम केले त्यांनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी सामाजिक काम करण्यास सुरुवात केली आहे.रोहा रायकर पार्क येथील विकास हौसिंग सोसायटचे सचीव पदावर पाच वर्षे सक्षमतेने कामं केले ज्येष्ठ नागरिक मंडळ रोहा या संस्थेत तीन वर्षे सचीव पदाचा कार्यभार सांभाळला वसुधा कार्यकारी मंडळात सदस्या म्हणून कार्यरत आहेत.रोहा तालुका शासकीय व निमशासकीय सेवा निवृत्त संघटनेचे कार्यकारी मंडळात सदस्या म्हणून त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. शैलजा देसाई यांचे सामाजिक कार्यातील योग्यता पध्दतेचा विचार करुन त्यांची अध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog