विकासकामाच्या पोचपावतीमुळे कुटूंबात पाच आमदार एक खासदार,

तुम्ही एकदा आमदार होऊन पुन्हा पंधरा वर्षांनी आमदार,

गोवे ग्रामपंचायतीत कोट्यावधी निधीच्या विकास कामांचे भूमीपूजन करत केले प्रतिपादन,           

गोवे-कोलाड (विश्वास निकम ) राजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही.मी गोवे गावात जरी १८ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आलो असलो तरी माझे मन मात्र दररोज तुमच्या गावात असते. गावच्या सर्वांगिक विकासासाठी तटकरे कुटूंब सैदैव तत्पर आहे यामुळे गोवे ग्रामपंचायत हद्दीतील विविध प्रकारची काही कोटीची विकास कामे झाली आहेत.अशा केलेल्या विविध विकास कामाच्या पोच पावतीमुळे माझ्या कुटूंबातील पाच आमदार व एक खासदार झाले आहोत .नागरिकांशी निगडित राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या गावचा सर्वांगिक विकास केला जात आहे असे प्रतिपादन खा. सुनिल तटकरे यांनी गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विकास कामांचे शुभारंभ व उर्वरित कामांचे भूमिपूजन खा.तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी चिल्हे येथील आ. रविशेठ पाटील यांनी केलेल्या पाच आमदार एक खासदार या वक्तव्याला प्रतिउत्तर देत पाटील यांना जशास तसे उत्तर देत टोला लगावला .

रोहा तालुक्यातील सर्वांगिक विकास कामात आघाडी घेत असलेल्या गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे ,मुठवली,शिरवली,येथील जलमिशन विकास अंतर्गत करण्यात आलेल्या गावातील अंतर्गत रस्ते व नळपाणी योजनेचा शुभारंभ व उर्वरित विकास कामांचा भूमीपुजन सोहळा रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांचा शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. गोवे, मूठवली, शिरवली,या गावातील एकत्रित विचार पाहता समाधान वाटतो तर गोवे गावातील बचत गट समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध मसाल्याची चव माझ्यासहित महाराष्ट्र चाखेल त्याच बरोबर एकत्रित गावातील तरुणांनाचा आखाडा पहिल्याचा समाधान या प्रसंगी व्यक्त करत हेच महाराष्ट्राचे कौशल्य आहे.तसेच या ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे तर गावच्या सर्वांगिक विकासासाठी कोठून कोठून निधी आणून ते विकास करतात ते कळत नाही.त्याची स्तुती करावी तेवढीच कमी आहे.

गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विकास कामांचा झंझावत व केलेल्या कामांचा शुभारंभ व उर्वरित विकास कामांचा भूमीजन सोहळा मोठ्या उत्साही व आनंदायी वातावरणात संपन्न करण्यात आले यावेळी कोकण स्थानिक स्वराज संस्था व विधान परिषदेचे आम . अनिकेतभाई तटकरे,खांब विभागीय जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे, तानाजी जाधव, सुरेश महाबळे, नारायण धनवी,बाबुराव बामणे,विजय कामथेकर, दत्ताराम मंचेकर, प्रीतम पाटील,वसंत भोईर,विश्वनाथ धामणसे,रामशेठ कापसे,संजय मोते, संजय मांडळुस्कर, रमण कापसे,संदेश कापसे,भरत कापसे,बि.एस.भोसले.नंदकुमार कापसे,रवि मरवडे, तसेच आंबेवाडी जिल्हा परिषद व गणातील सर्व सरपंच उपसरपंच,सदस्य कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी आ.अनिकेत तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि मी.गोवे ग्रामपंचायत हद्दीतील तिन्ही गावातील तट एकत्र करून ग्रामपंचायत बिनविरोध निवडून द्या तरच तिन्ही गावाचा सर्वांगिक विकास केला जाईल ग्रामपंचायत बिनविरोध निवडू आली त्या वचनांचे पालन करत विकासासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सैदैव कटिबद्ध आहोत विविध विकास कामे करण्यात आली ४ कोटी रस्त्याचा निधी ही मंजूर झाला असून त्या अगोदर माहिसदरा नदीला गेलेल्या खांडीची बांध बंधिस्ती होणे गरजेचे आहे ते ही काम येत्या कालावधीत केला जाईल असे आश्वासन देत शेतकरी वर्गाला आनंदित केले.तसेच गोवे ग्रामपंचायतीचे विकासाचे महामेरू व कर्तव्य दक्ष सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि विकासाचे शिलेदार खासदार सुनील तटकरे यांच्या आशिर्वादामुळे व आ.भाई अनिकेत तटकरे, पालक मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या सहकार्यामुळे गोवे ग्रामपंचायतीला ४ कोटी ६५ लाख रुपयाचा भरीव निधी उपलब्ध झाला.तसेच कै.दत्ताजीराव तटकरे साहेब यांचा खरा आधार आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळे डोळवहाळ धरण बांधण्यात आले या धरणामुळे रोहा तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनता पाण्याचा उपयोग घेत आहे.गोवे ग्रामपंचायत हद्दीतील लोकांचे तट व गट भारत-पाकिस्तान सारखे होते ते सर्व एकत्रित येऊन राहिलेले नाही.आता फक्त एकच उणीव आहे कि साहेब या ग्रामपंचायत हद्दीत दारू धंदे आहेत. ते २६ जानेवारी पासून बंद व्हावे यासाठी प्रयत्न करावे.

         सर्व कार्यक्रमासाठी सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच नितीन जाधव,सदस्य नरेंद्र पवार,सुप्रिया जाधव, रंजिता जाधव, निशा जवके,अंजली पिंपलकर,भावना कापसे, सुमित गायकवाड तसेच विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,संदीप जाधव,गोवे ग्रामस्थ तरुण वर्ग व महिला मंडळ यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे प्रस्तावीक सुप्रिया जाधव,सूत्रसंचालन आकांशा शिर्के तर कार्यक्रमाचे आभार नरेंद्र पवार यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog