सुतारवाडी महिला मंडळातर्फे श्रीदत्त मंदिरात हळदीकुंकू सौ.वरदाताई सुनिल तटकरे यांची विशेष उपस्थिती
सुतारवाडी (हरिश्चंद्र महाडिक) सुतारवाडी येथील महिला मंडळातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन येथील महिला मंडळातील सर्व महिलांनी उत्तम प्रकारे केले होते. या वर्षीच्या हळदी कुंक कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे येथील कार्यक्रमास सौ. वरदाताई सुनिल तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला.
उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सौ. वरदाताई सुनिल तटकरे म्हणाल्या पूर्वी सुतारवाडी हे छोटेसे खेडेगाव होते. आता सुतारवाडी खूपच बदलली आहे सुतारवाडी नाक्यावर विविध प्रकारची दुकानं, हॉटेल्स तसेच अन्य महत्वाची दुकानं झाली आहेत. त्यामुळे दिवसें - दिवस सुतारवाडी बहरत असून सुतारवाडी गावाची वाटचाल प्रगती पथावर असून या परिसरातील मुलं - मुली उच्चशिक्षित आहेत .
मी कुठल्याही पदावर नाही. कुटुंबाला सांभाळणे ही सुद्धा मोठी जबाबदारी असून येथील महिला ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. विशेष म्हणजे गृहिणी सर्वांना सांभाळून घेतात. कोणाला काय हवं नको ते कटाक्षाने पाहत असतात. तुम्ही गृहिणी आहात हीच मोठी जबाबदारी आहे असे सांगून त्यांनी शेवटी सांगितले की येथील महिलांनी गेल्यावर्षी कोरोनामुळे हळदी कुंकूचा कार्यक्रम केला नाही. परंतु या वर्षी गावांतील सर्व महिलांनी अतिशय मेहनत घेवून हळदी कुंकू हा कार्यक्रम श्री. दत्त मंदिरात चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.
हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे श्री. सत्यनारायणाची पुजा, हरिपाठ, भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन सुतारवाडी महिला मंडळाने केले होते तिर्थ प्रसादाचा लाभ परिसरातील ग्रामस्थांनी घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुतारवाडी गावांतील सर्व महिलांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी संदिप चिविलकर, विजय सावंत तसेच ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
शेवटी उपस्थित महिलांना वाण व तिळगुळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment