चिल्हे येथील लिलावती (पार्वती)महादेव महाडिक यांचे आकस्मित निधन,

कै. लीलावती (पार्वती) महाडिक 

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील विद्युत महावितरण महामंडळातून सेवा निवृत्त झालेले कर्मचारी कै. महादेव सुर्या महाडिक यांच्या पत्नी व तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे माजी सदस्य रमेश महाडिक यांच्या मातोश्री श्रीमती लिलावती (पार्वती ) महाडिक यांचे वयाच्या 78 व्या वर्षी 13 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले.

     चिल्हे गावातील व मोठ्या महाडिक परिवारातील लिलावतीबाई यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळाऊ तसेच सर्वांच्यात मिळून मिसळून राहणाऱ्या लिलावती महाडिक यांचे अचानकपणे आकस्मित निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून महाडिक परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे .त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,पुतणे,सुना,जावई, नातवंडे,पतवंडे,असा मोठा परिवार आहे तसेच त्यांचे पुढील दशक्रिया विधी शनिवार 22 जानेवारी व उत्तरकार्य तेरावा बुधवार 25 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Comments

Popular posts from this blog