खोटी नारळं फोडून सत्तेचा उपभोग घेण्याचे तटकरेंचे महान कार्य,
कुटूंबात पाच आमदार एक खासदार असल्याचे आ.रविशेठ पाटलांचे प्रतिपादन!
खांब विभागात विकास कामांचा शेठने सुरू केला झंझावत!
कोलाड (श्याम लोखंडे) गावच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्रित या एक संघटित राहिलात तर आपल्या गावचा विकास होण्यास वेळ लागणार नाही मी कॅबिनेट मंत्री असतांना चारशे ते पाचशे कोटींचा निधी उपलब्ध केला अनेक विकासकामे मंजुरी करून आणली मात्र त्याची खोटी नारलं फोडण्याचे काम तटकरेंनी केले मी दिलेल्या पत्रकाची स्थानिक पातळीवर अडवणूक करणे तसेच त्यांना ग्राम पंचायत मध्ये ठराव न देणे असे काम त्यांचे आहे एका कुटूंबात पाच आमदार आणि सहावे खासदार असा सत्तेचा उपभोग घेण्याचा तटकरेंचा महान कार्य आहे. असे प्रतिपादन खांब विभागातील तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत हद्दीतील आम.रविशेठ पाटील यांच्या शुभहस्ते विविध विकास कामांचे शुभारंभ व भूमिपूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते .
रोहा तालुक्यात तसेच तटकरेंच्या बालेकिल्ल्यात खांब विभागात पेण रोहा सुधागडचे स्थानिक आ.रविशेठ पाटील यांनी विकास कामांचा झंझावत सुरू केले असून तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत हद्दीतील मौजे चिल्हे येथे स्थानिक आमदार निधी विकास कार्यक्रम अंतर्गत स्त्याचे काँक्रीटीकरनाचे शुभारंभ व उर्वरित रस्त्याच्या भूमिपूजन सोहळा चिल्हे येथील शिवसेने शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आ.राविशेठ पाटील बोलत होते .
यावेळी रोहा तालुका शिवसेना शाखा प्रमुख समीर शेडगे,उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मारुती देवरे,माजी पंचायत समिती सदस्य तानाजी देशमुख, विष्णू मोरे,रायगड भाजप युवामोर्च्या अध्यक्ष अमित घाग,तळवली सरपंच सौ रुपाली कोस्तेकर ,माजी पं. स.सदस्या सौ.चेतनाताई लोखंडे,रोठ सरपंच नितीन वारांगे,माजी पं. स.सदस्य महादेव जाधव,कुलदीप सुतार,सुनील महाडिक, मारुती खांडेकर सर ,रघुनाथ कोस्तेकर, महेश ठाकूर,माजी सरपंच धनाजी लोखंडे,पुगावचे माजी सरपंच प्रवीण देशमुख,रवींद्र तारू,संतोष पडवळ,राम महाडिक , अरविंद भिलारे,नरेंद्र मरवडे,सुधीर लोखंडे ,अनंत लोखंडे,किशोर महाडिक, आदी ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होते .
यावेळी ते पुढे म्हणाले की मी राजकारणी नव्हे तर समाजकारणी माणूस आहे समाजासाठी आहो रात्र झटणारा आहे तुम्ही सर्वांनी जागृत रहा भाजप शिवसेने एकत्रित निवडणुका लढलो चांगले घवघवीत यश देखील आले परंतु त्या देवाच्या मनात काय आले की सत्तेपासून दूर राहावे लागले परंतु देशात राज्यात काही घडो मात्र स्थानिक पातीवर भाजप सेना एकत्रित आल्याशिवाय जीवन जगता येणार नाही गावचा सर्वांगिक विकास साधायचा असेल तर एकत्रित येऊन सर्व निवडणूका लढलो पाहिजे नगरपालिका,ग्राम पंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद,या निवडणुका युती करून समिरशेठ तुम्ही जिंका पाच आमदार सहावे खासदार अधिक पालकमंत्री एकाच कुटूंबात आहेत असा टोला यावेळी शेवटी पुन्हा लगावला .
रोहा नगरपरिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही:- समीर शेडगे
स्थानिक पातळीवर भाजप शिवसेना एकत्रित आहे गेली पंचवीस तीस वर्ष सत्ता स्थापन करून बसलेल्याना धडा शिकवायला हवा सर्वांगिक गावच्या विकासासाठी तसेच विविध विकास कामांसाठी तुम्ही एकत्रित या आ.रविशेट पाटील,आ.महेंद्रशेठ दळवी यांच्या कुशल नेतृत्वाखाली आता रोहा ग्रामीण भागातील जनतेची व त्या गावातील सर्वांगिक विकास कामांचा खरा झंझावत सुरू झाला आहे दोन्ही आमदारांच्या प्रयत्नातून कोट्यवधी निधीची मंजुरी मिळाली आहे काही दिवसांनी त्यांची कामे देखील सुरू केली जातील तसेच पुढे होत असलेल्या प्रत्येक निवडणूकी साठी त्यांना टक्कर देण्यासाठी सेना भाजप एक होऊन रोहा नगरपरिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे रोहा तालुका शाखाप्रमुख शाखा प्रमुख समीर शेडगे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश महाडिक यांनी केले तर प्रास्ताविक सुदाम महाडिक यांनी तर आभार मानून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Only bjp
ReplyDelete