माणुसकीचा महामेरू सुरेंद्र(बंडया) येरूणकर यांचे दुःखद निधन चिंचवली पंचक्रोशीत शोककळा!

 कै.सुरेंद्र (बंड्या)येरुणकर 
रायगड (भिवा पवार)माणुसकी म्हणजे संस्कार, माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा आदर, माणुसकी म्हणजे निस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात, आणि अखंडपणे माणुसकीचा संस्कार जपलेला माणुसकीचा चिंचवलीचा महामेरू सुरेंद्र उर्फ बंड्या येरूणकर यांचे ४जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
 चिंचवली तर्फे दिवाळी येथील हसमुख चेहरा सुरेंद्र येरुणकर यांचे वयाच्या ४५व्या वर्षी दुःखद निधन झाले. सुरेंद्रच्या निधनाची बातमी समजताच असंख्य मित्र परिवार तसेच येरूणकर परिवार आणि ग्रामस्थ यांना तीव्र दुखः झाले. सुरेंद्रच्या अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला. कै सुरेंद्र (बंडया) येरुणकर यांनी आपल्यकडे मदतीसाठी आलेल्यासआदिवासी गोरगरीब कोणासही कधीही रिकाम्या हाताने पाठविले नाही उपाशी पाठविले नाही. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या बंडयाचे निधन झाल्याची बातमी समजली तेव्हा अनेकांना धक्का बसला. आपल्या घरातील व्यक्तीचे निधन झाले आहे असा भाव प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होता.
ज्या ज्या वेळी गावच्या विकासासाठी चर्चा व्हायची तेव्हा बंड्या पुढे यायचा, गावाच्या सामाजिक, शैक्षणिक  सांस्कृतिक विकासासाठी बंडया पुढे असायचा. बंड्याच्या आकस्मिक निधनाने चिंचवली पंचक्रोशी शोककळा पसरली असून येरुणकर कुटुंबाच्या दुःखात चिंचवली  जय भवानी क्रीडा मंडळ येरुणकर भावकी चिंचवली ग्रामस्थ, चिंचवली संतोषनगर आदिवासीवाडी, दत्तवाडी ग्रामस्थ मंडळ भिम सेवा संघ चिंचवली मुंबई कमिटी व रमाबाई महिला मंडळ चिंचवली, दुःखात सामील असून बंडया येरुणकर यांच्या आकस्मिक निधनाने चिंचवली परिसरात शोककळा पसरली आहे. असून माणुसकी जपणारा तरुणकार्यकर्ता बंड्याचे निधनाने सर्वत्र परिसरात शोककळा पसरली आहे. 

     कै. सुरेंद्र एस टी मंडळात १९९६ साली रुजू झाला होता. प्रेमळ मनमिळाऊ स्वभाव, बोलका हसरा चेहरा यामुळे त्याचा मित्र परिवार मोठा होता. कोणी कधीही नुसता फोन करून एस टी चे आरक्षण किंव्हा विद्यार्थ्यांच्या सहली साठी एस टी ची विचारणा करता त्वरित त्यांचे काम करायचा. अश्या हसमुख आणि परोपकारी सुरेंद्र च्या निधनाने अनेकांना अश्रू आवरता आले नाही. सुरेंद्रच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण,आई असा परिवार आहे. 

सुरेंद्रचा दशक्रिया विधी गुरुवार दि १३ जानेवारी २०२२तर तेरावे१६जानेवारी रोजी राहत्या घरी चिंचवली तर्फे दिवाळी येथे होणार असल्याचे येरूणकर परिवाराने सांगितले.


Comments

Popular posts from this blog