तटकरे कुटुंब गावच्या सर्वांगिक विकासाठी कटिबद्ध गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विविध विकास कामांची वचनपूर्तता,

उद्या विकास कामांचे शुभारंभ व भूमिपूजन!

गोवे कोलाड (विश्वास निकम )कोकणचे भाग्यविधाते विकासाचे शिलेदार रायगड रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे ,पालकमंत्री कु.आदीतीताई तटकरे,आ.अनिकेत तटकरे हे गावच्या सर्वांगिक विकासासाठी कटीबद्ध असून रोहा तालुक्यातील गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विकास कामांची वचनपूर्तता करत उद्या २३ जानेवारी रोजी गोवे ग्राम पंचायत हद्दीतील मुठवली ब्रु. येथे सायं ५ वा. व गोवे येथे सायं ६ वा.दिलेल्या वचनांचे पालन करत गावातील जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या विकास कामांचा तसेच अंतर्गत रस्त्यांचा शुभारंभ व उर्वरीत विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांचया प्रमुख उवस्थित व त्यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे

तालुक्यात विकास कामात आघाडी घेत असलेल्या गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे व मूठवली ब्रु. येथे खा.सुनिल तटकरे यांच्या शुभहस्ते व आदितीताई तटकरे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रायगड, यांच्या अध्यक्षतेखाली व आ.अनिकेत तटकरे यांच्या उपस्थिती रविवार दि.२३/०१/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वा. मूठवली बु.येथे तर सायंकाळी ६.०० वाजता गोवे येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन व उदघाटन सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी आंबेवाडी जिल्हा परिषद गणातील सर्व सरपंच,उपसरपंच, सदस्य, युवा कार्यकर्ते, जेष्ठ कार्यकर्ते, उपस्थित राहणार आहेत.

 या कार्यक्रमासाठी सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच नितीन जाधव, सदस्य नरेंद्र पवार, सुप्रिया जाधव,रंजिता जाधव, निशा जवके, अंजेली पिंपळकर, भावना कापसे, सुमित गायकवाड,व रामशेठ कापसे, नरेंद्र जाधव, रमण कापसे, प्रविण पवार,संदीप जाधव, संदेश कापसे, लहू पिंपळकर, भरत कापसे, राकेश कापसे, राजा जाधव, नितीन जवके,व सर्व गोवे मुठवली ब्रू येथील गावकमेटी ग्रामस्थ मंडळ, युवक मंडळ, महिला मंडळ विशेष मेहनत घेत आहे.

Comments

Popular posts from this blog