कोलाड विभाग शिवसेनेची आढावा सभा उत्सहात संपन्न 

 गोवे-कोलाड (विश्वास निकम  शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार महेन्द्र दळवी, शिवसेना सल्लागार तथा जि प सदस्य किशोर भाई जैन यांच्या मार्गदर्शना नुसार शनिवार दि. १५/०१/२०२२ रोजी शिवसेना ता प्रमुख समीर शेठ शेडगे यांच्या अध्यक्षते खाली कोलाड विभागाची शिवसेनेची आढावा सभा उत्सहात संपन्न झाली.

              सदर बैठकीला रोहा तालुका प्रमुख विष्णू भाई लोखंडे, उप तालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे,रोहा पं समिती सदस्या चेतना ताई लोखंडे, ग्रा. सं उप जिल्हा प्रमुख विजय बोरकर, विभाग प्रमुख कुलदिप सुतार, ग्रा. सं विभाग प्रमुख ज्ञानेश्वर खामकर, उप विभाग प्रमुख अजित चितळकर, राजेन्द्र यादव, संतोष पडवळ, सुनिल महाडीक, संजोत पडवळ तसेच शिवसेनेचे सर्व शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, महिला आघाडी चे पदाधिकारी, ग्रा पंचायत सदस्य तसेच विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        सदर बैठकीत विभागतील मागील २ वर्षतील झालेल्या कामांचा, निवडूकांचा,प्रकर्षाने समोर आलेल्या समस्येचा थोडक्यात आढावा विभाग प्रमुख कुलदिप सुतार यांनी सांगितले, मागील कालावधीत आंबेवाडी जिल्हा परिषदेच्या विविध ग्रा पंचायतीतून निवडून आलेल्या सदस्या चा सत्कार करण्यात आले. 

        सदर उपस्थित कार्यकर्ते ना संबोधित करताना विभागातील शिवसैनिकांच्या कामगिरी वर ता प्रमुख समिर शेठ यांनी समाधान व्यक्त केले, त्याच प्रमाणे विभागातील प्रलंबित कामासाठी उप ता प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभाग प्रमुख कुलदिप सुतार हे सातत्याने पाठपुरावा केल्याने अमदार महेन्द्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध होण्यास मदत मिळाल्याच ही नमुद केले. सदर सभेत ता प्रमुख समीर शेठ यांच्या प्रयत्नाने उपलब्ध निधीतून वितरीत केलेल्या कामांच्या प्र. मा. च्या प्रती त्या त्या गांवाच्या लोकप्रतिनिधी कडे देण्यात आले. तसेच मागील २ वर्ष कोरोना कालावधीत राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व कामे ठप्प राहील्या कारणे विकास कामांना गती मिळू शकली नाही परंतु या पुढे मोठ्या प्रमाणात विकास कामांना गती देणार आसल्याचे या वेळी त्यानी सांगीतले, महिलांनी उपस्थित केलेल्या पाणी प्रष्नाच्या संदर्भात बोलताना पाणी पुरवठा मा मंत्री गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे नेते आसून त्यांच्या फंडातून आमदार महेन्द्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील खाडी पटट्या लगतच्या गावांना १००कोटी चा निधी होवून पुढिल ६ महिन्यात ही कामे पूर्ण होणार असल्याचे सांगितले तसेच त्याच्या धर्तीवर विभागातील पाण्याची टंचाई असणार्या गांवा़ना पाणी मिळवून देण्यासाठी वचन बंध असल्याचे सांगीतले. 

        तसेच मागील जिल्हा परिषद च्या निवडणुकीत शिवसेनेचा थोडक्यात पराभव झाला होता तर आंबेवाडी पंचायत समिती मद्ये सौ चेतना ताई या निवडून आल्या होत्या तर बहुतांश ग्रा पंचायतीत थोडक्या मतांनी शिवसेचे उमेदवार पराभूत झाले होते परंतू नजिकच्या कालावधीत येवू घातलेल्या निवडणुकीत आ महेन्द्र शेठ दळवी, किशोर भाई जैन यांच्या , ता प्रमुख समीर शेठ शेडगे या़च्या मार्गदर्शन खाली तसेच उप ता प्रमुख चंद्रकांत लोखंडे, विभाग प्रमुख कुलदिप सुतार यांच्या नेतृत्वाखाली आंबेवाडी जिल्हा परिषद भगवा करण्याच संकल्प करण्यात आले.  

     या वेळी ग्रा संरक्षण विभाग प्रमुख ज्ञानेश्वर खामकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog