तळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश,

                  शिवसेनेची पिछेहाट

        राष्ट्रवादी काँग्रेस १० जागांवर विजयी तर शिवसेनेचे ४ भाजपाला ३ जागांवर विजयी संपादन



तळा(कृष्णा भोसले) तळा नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली असुन १०जागावर उमेदवार निवडून आल्याने एकहाती सत्ता घेत दणदणीत विजय मिळवला आहे.

    या आधीच्या निवडणुकीत शिवसेना सत्तेवर आली होती.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार मोठी खलबते होत होती.यावेळी खा.सुनिल तटकरें, पालकमंत्री अदिती तटकरे, विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी लक्ष घालून तळा नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापनेचा चंग बांधला.येथील मतदारांनी सुद्धा त्यांच्या बाजूने कौल दिला.आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आल्याने विकासाची घौडदौड सुरू होईल अशी आशा तळेकरांच्या मनात आहे.ती पुर्ण करण्याची जबाबदारी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सोपवली आहे.

   तळा नगर पंचायत प्रभाग १ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार ग्रिष्मा गणेश बामणे याना १८८मते पडली.तर शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी हिंरु मांडवकर १३२ मते,प्रभाग २मध्ये शिवसेनेचे विजयी उमेदवार नरेंश बाळु सुर्वे यांना १४७ मते तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभुत उमेदवार योगेश रमेश सकपाळ यांना १३०मते, प्रभाग क्रमांक ३मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार यामिनी जनार्दन मेहतर यांना १२१ मते तर शिवसेनेच्या पराभूत उमेदवार विद्या विलास तळेकर यांना ७१ मते पडली.प्रभाग क्रमांक ४ मध्ये विजयी उमेदवार अपक्ष शिवसेना पुरस्कृत सिराज महमदशरीफ खाचे यांना १८० मते तर आमदी अब्दुरब मुल्ला अपक्ष यांना ६२ मते पडली

       प्रभाग ५ मध्ये भाजपाच्या विजयी उमेदवार दिव्या निलेश रातवडकर यांना ११७ मते तर प्रतिस्पर्धी केतकी धवल टिळक शेकाप यांना ९९ मते तर शिवसेनेच्या उमेदवार प्रविणा योगेश चांडिवकर यांना५८ मतांवर समाधान मानावे लागले.प्रभाग क्रमांक ६मध्ये शिवसेनेच्या विजयी उमेदवार नेहा नमिता पांढरकामे यांना १५५ मते तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या दिव्या दिलीप वडके यांना १४३ मते, प्रभाग ७ मध्येअपक्ष शिवसेना पुरस्कृत उमेदवार मंगेश गणपत पोळेकर हे बिनविरोध निवडून आले होते.

प्रभाग ८विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारीका महेश गवळी यांना १४० मते तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार सुलोचना देवजी कठे यांना ८५ मते पडली.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार पुष्पा हरिश्चंद्र नागे यांना ८८ मते तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या दयानंद लहु जाणराव यांना ८७ मते पडुन१मताने पराभुत व्हावे लागले.प्रभाग क्रमांक १० मध्ये विजयी उमेदवार राष्ट्रवादीचे मंगेश रामचंद्र शिगवण यांना ८८ मते पडली तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार प्रविण भागोजी फोंडळ यांना ३४ मते पडली. प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत महादेव रोडे यांना १४१ मते तर शिवसेनेचे उमेदवार गुरुदास राजाराम तळकर यांना५३ मते पडली.प्रभाग क्रमांक १२ राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार अविनाश रविन्द्र पिसाळ यांना ११८ मते तर शिवसेनेचे पराभुत उमेदवार महेन्द्र नारायण महाडकर यांना ११२ मते पडली. प्रभाग क्रमांक १३ विजयी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना विजय तांबे यांनी ८२ मते तर प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुजाता सुरेश साळवे यांना ५२ मते पडली.प्रभाग १४ मध्ये विजयी उमेदवारभाजपाचे रितेश रविन्द्र मुंढे यांना १४५ मते तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार तब्सुम रहाटविलकर यांना ९४ मते, योगेश शिर्के (शिवसेना) ७६ मते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार देवयानी समिर मोरे यांना ८६ मते पडली, प्रभाग क्रमांक १५ राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवार अस्मिता चंद्रकांत भोरावकर यांना १५१ मते तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या पराभुत उमेदवार सुलोचना देवजी कटे यांना ६ मते पडली.प्रभाग क्रमांक १६ मध्येभाजपाच्या विजयी उमेदवार सुरेखा नामदेव पवार यांना १८८ मते तर शिवसेनेच्या पराभूत उमेदवार सविता रमेश जाधव यांना ५६ मते पडली.तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार माधुरी शैलेश घोलप यांना १९४ तर शिवसेनेच्या पराभूत उमेदवार कविता भास्कर गोळे १४८ मते पडली.

मनसेच्या नम्रता विठ्ठल मंडलिक यांना १२१ मते पडली.या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापनेचा मार्ग खुला झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

Comments

Popular posts from this blog