मांजरवणे शिवसेना माजी उपविभाग प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते सुरेश तटकरे यांना मातृशोक

कै. पार्वतीबाई पांडुरंग तटकरे 

माणगाव (प्रतिनिधी ) माणगाव तालुक्यातील बाट्याचीवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच मांजरवणे शिवसेना माजी उपविभाग प्रमुख सुरेश पांडुरंग तटकरे यांच्या मातोश्री कै. पार्वतीबाई पांडुरंग तटकरे यांचे 90 व्या वर्षी 9जुलै2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

 कै. पार्वतीबाई तटकरे यांचा परोपकारी व प्रेमळ स्वभाव सर्वांना परिचित होत्या.त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक, व विविध क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, जावई, पुतणे नातवंडे, असा मोठा परिवार आहे. त्यांची दशक्रिया विधी  सोमवार 18 जुलै रोजी तर उत्तर कार्य वार बुधवार 20 जुलै रोजी राहत्या घरी बाट्याची वाडी ता. माणगाव इथे होणार आहेत.कै. पार्वतीबाई तटकरे यांच्या निधनाने मांजरवणे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. 

Comments

Popular posts from this blog