पुगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प.शंकर (किसन)भोईटे यांचे निधन

कै. ह.भ.प.शंकर(किसन )भोईटे 

खांब (नंदू कळमकर)रोहा तालुक्यातील मौजे पुगांव गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आध्यत्मिक वारकरी संप्रदायाचे वारसा वारसा जोपासणारे  ह. भ. प. शंकर विठ्ठल भोईटे यांचे मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे ते ९६ वर्षांचे होते.

ह.भ.प. शंकर विठ्ठल भोईटे यांचा स्वभाव प्रेमळ शांत आणि मनमिळाऊ सर्वांच्या  परोपकारी पडणारे तसेच  ते किसन या नावानेच सर्वांच्या सुपरिचित होते.तर त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी मोठा सहभाग असत.त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील असंख्य नातेवाईक व नागरिक तसेच समस्त पुगांव ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते तसेच असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन पर भेट घेतली.त्यांच्या पश्चात एक मुलगा अरुण शंकर भोईटे व तीन मुली, सुना,पुतणे,नातवंडे व मोठा भोईटे परिवार आहे.ह.भ.प.शंकर भोईटे यांचे पुढील दशक्रिया विधी गुरुवारी १४ जुलै पुगाव येथील श्री क्षेत्र कमलेश्वर मंदिर शेजारील तलावावर येथे व उत्तरकार्य विधी रविवार दि.१७ जुलै २०२२ रोजी यावेळी सुश्राव्य किर्तन ह. भ. प. बबन महाराज वांजळे यांची श्रद्धांजलीवर कीर्तनरुपी सेवा होत मत्यांच्यावर पुष्प श्रद्धांजली अर्पण करून. त्यांच्या पुगांव येथील निवस्थानी संपन्न होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog