प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड जतन संवर्धन केले तरच माणसाचे अस्तित्व टिकेल :-वनपाल पी.एस. वाघमारे

 इंदापूर नवजीवन विद्यालयात वन महोत्सव साजरा 

माणगाव (प्रतिनिधी )कोरोना काळामध्ये ऑक्सिजन साठी माणसाची चाललेली धडपड आपण सर्वांनीच पाहिली आहे. वृक्ष लागवड जतन संवर्धन केले तरच माणसाचे अस्तित्व टिकेल. प्रत्येक वर्षी लहान थोर सर्वांनीच एकतरी झाड लावून त्याचे जतन संवर्धन केले तरच पर्यावरनाचे संतुलन राहील असे प्रतिपादन वन परिमंडळ इंदापूरचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष वनपाल पी. एस. वाघमारे यांनी केले. ते वन परी मंडळ इंदापूर यांच्या विद्यमाने  दिनांक १४जुलै रोजी  यांच्या विद्यमाने नवजीवन विद्यालय इंदापूर येथे घेण्यात आलेल्या वन महोत्सवात ते बोलत होते ते पुढे म्हणाले की जंगल झाडे वाचविण्याची जबाबदारी शासनाची नसून समाजातील प्रत्येक व्यक्तीचीही जबाबदारी आहे. या उदात्त भावनेने आपण या वन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.

  यावेळी वृक्षारोपण करण्यासाठी मौजे इंदापूर येथे वृक्षरोपण करण्यासाठी  ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत सरपंच  सौ. नवगणे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले. तसेच नवजीवन विद्यालय इंदापूर येथील विद्यार्थी तसेच कर्मचारी यांनी अनेक वनौषधी वृक्षांची लागवड केली. यावेळी नवजीवन विद्यामंदिर तळा  कर्मचारी श्री सूरवसे ए. बी. पर्यवेक्षक श्री जाधव एम. बी. सहा. शिक्षक श्री हजारे एस. जी. सहा. शिक्षक श्री भिसे वाय. ए. सहा. शिक्षकश्री ठोंबरे एस. एस. सहा. शिक्षकश्री गोसावी एस. जी. शिपाईश्री राव जे. आर. कनिष्ठ लिपिक तसेच वन परिमंडळ इंदापूरचे श्री पी. एस. वाघमारे वनपाल इंदापूर, श्री ए. व्ही. जाधव  वनरक्षक - माकटी श्री. एच. यू. बनसोडे वनरक्षक - रातवड यांच्या उपस्थितीत वनमहोत्सव साजरा करण्यात आला.

 नुकतेच नवजीवन विद्यालय इंदापूर येथे वन परिमंडळ इंदापूर यांच्या विद्यमाने वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृक्षारोपण करताना तळाशेत ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ नवगणे मॅडम, वन परिमंडळ इंदापूरचे कर्मचारी  व नवजीवन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी छायाचित्रात दिसत आहे.






Comments

Popular posts from this blog