गोवे येथे कोलाड रोहा लायन्सक्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

खांब (नंदकुमार कळमकर)रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांनी सामाजिक सेवेची जाण लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी गोवे शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना लायन्स क्लब कोलाड रोहा च्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला वह्या,व पेन्सील बॉक्स, इत्यादी.शैक्षणिक साहित्याचे वाटप गोवे शाळेत करण्यात आले. यावेळी क्लबचे सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे,उपाध्यक्ष डॉ. मंगेश सानप, लायन महेश तुपकर, विश्वास निकम, सामाजिक कार्यकर्ते विजय पवार,गोवे ग्रामपंचायत सदस्या रंजिता जाधव, अंगणवाडी सेविका सुजाता जाधव,दिनेश खराडे,पायल जाधव, संध्या जाधव, सुचिता शिर्के, अर्पिता जाधव,अस्मिता पवार,वैशाली आंबेकर, सुचिता मुसळे, मेघा जवके, प्राजक्ता पवार, जयश्री वाफिळकर,श्रुती सुर्वे, शारदा मुसळे,आदी पालकवर्गासह विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक जयेश महाडिक सर व उपशिक्षिका गांधारे मॅडम यांच्या उपस्थितीत लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा यांच्या सहकार्यातून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.                                                                          लायन्सक्लबचे अध्यक्ष डॉ.सागर सानप यांच्या विशेष मार्गदर्शनातून व सामाजिक बांधिलकीतून केलेल्या मदतीचे शाळेकडून व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक महाडिक यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन रविंद्र लोखंडे यांनी केले तद्नंतर डॉ श्याम लोखंडे व डॉ मंगेश सानप यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मोलाचे विशेष मार्गदर्शन केले व शेवटी आभार विजय पवार यांनी मानत विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करत या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog