सतत जोरदार पडणाऱ्या पावसामुळे सुतारवाडी धरण भरले!

  सुतारवाडी : (हरिश्चंद्र महाडिक)४ जुलै २०२२ पासून सतत जोरदारपणे पडणाऱ्या पावसामुळे सुतारवाडी येथील लघु पाटबंधारे योजनेचा धरण तुडुंब भरला आहे. दि. २ जुलै २०२२ रोजी पाण्याची पातळी ९३.३४  मी. एवढी होती. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा २.२६४ द.ल.ध.मी. व विसर्ग (क्यूरेक्स) ८९४.७६४ एवढा आहे. धरण पूर्ण भरले असून पूर्ण सुरक्षित आहे.

         सुतारवाडी येथे लघु पाटबंधारा योजने अंतर्गत सन १९७७ साली धरण पूर्ण बांधून तयार झाले. या धरणाची लांबी ३२५ मीटर असून उंची १६.३९ मीटर एवढी आहे. येथील धरणामध्ये एकूण पाणीसाठा २.३२० दशलक्ष घनमीटर एवढा असून उपयुक्त पाणीसाठा २.२६४ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणामध्ये निरूपयोगी पाणीसाठा ०.०५६ दशलक्ष घनमीटर एवढा आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ९.८४ चौरस किलोमीटर एवढे आहे. तर भूसंपादन क्षेत्र ५८.२० हेक्टर एवढे आहे. धरणातील पाण्याची साठा पातळी ९३.३५ एवढी आहे. जोरदार पाऊस पडला की पाण्याची पातळी ९३४.५२८ क्यूरेक्स एवढी असते. सुतारवाडी धरणाचा परिसर हा  अवाढव्य असून निसर्गाच्या सानिध्यात आहे. वर्षाच्या बाराही महिने या धरणाला मुबलक पाणी असते. निसर्गाच्या सानिध्यात धरण असल्यामुळे अनेक पर्यटक जेव्हा फार्म हाऊसला येतात तेव्हा येथील धरणाचा आणि निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आवर्जून येतात. या ठिकाणी मद्यपी सुद्धा हजेरी लावत असल्यामुळे परिसरात मद्याच्या बाटल्या त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या बॉटल अस्त व्यस्त टाकलेल्या अवस्थेत असतात. मात्र लघु पाटबंधारे विभागाचे लेखनिक संदेश बिरवाडकर आणि कालवा चौकीदार शिवाजी सावंत हे जातीने परिसरात लक्ष घालून परिसर स्वच्छ ठेवतात. येथील पाण्याचा उपयोग येरळ ग्रामपंचायत, जामगाव ग्रामपंचायत आणि कुडली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ग्रामस्थांना पिण्यासाठी होतो.

     सुतारवाडी धरणाला उपविभागीय अधिकारी महामुनी साहेब यांनी ५ जुलै रोजी भेट दिली.

Comments

Popular posts from this blog