गोवे गावच्या चंद्रभागा पवार यांचे दुःखद निधन
गोवे-कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवाशी चंद्रभागा दगडू पवार यांचे बुधवार दि.२९ जून २०२२ रोजी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते.त्या परोपकारी व प्रेमळ स्वभाव सर्वाना परिचित होत्या.तसेच समाज कार्यात नेहमी सक्रिय होत्या. त्या स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या सदस्या होत्या त्यांना भजन व किर्तन यांची आवड होती.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्याच्या अंत्यविधीसाठी राजकीय, सामाजिक व इतर विविध क्षेत्रातील मान्यवर व समस्त गोवे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पच्यात दोन मुले, तीन मुली, दोन सुना,तीन जावई,पुतणे, नातवंडे, पतवंडे व मोठा पवार परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार दि.८ जुलै तर उत्तरकार्य विधी सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी त्यांच्या गोवे येथील निवासस्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment