रायगड जिल्ह्यात कासार उद्योजक सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
इंदापूर (प्रतिनिधी) रविवारी ३ जुलै २०२२ रोजी अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाच्या आवाहनाने संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता या अनुषंगाने रायगड मध्ये "कासार उद्योजक सामाजिक संस्थेच्या वतीने" संस्थेचे सदस्य श्री.वामनजी रांगोळे यांची मेहनत,आधुनिक शेती करण्याची पद्धत हे सर्व पाहून त्यांच्या कार्यास हातभार लावण्याच्या उद्देशाने काजू,फणस,कोकम,लिंबू,सोनचाफा,अशी विविध लवकर उत्पादने देणारी
रोपे त्यांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबा समवेत वृक्षरोपन कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष व मध्यवर्तीचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष श्री.गणेशजी साळवी,महिला अध्यक्षा रियाजी कासार ,संस्थेचे सह सचिव व मध्यवर्ती मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख श्री.दिपकजी मांगले श्री.गोपीनाथजी वारे कु.हर्षल साळवी,कु. द्रोण मांगले हे उपस्थित राहून "कासार छाया" वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न केला.
Comments
Post a Comment