शिवराज्यभिषेकदिनी 'बा रायगड'सदस्यांना गवसलेली तोफ तिच्या मूळ महादेवमाळ ठिकाणी विराजमान करण्यास बा रायगड टीमला यश छत्रपती संभाजी राजांनी केले कौतुक!
कोलाड (श्याम लोखंडे) बहुजन प्रतिपालक वंदनीय महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर वीर पराक्रमी योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून रोजी रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साह वातावरणात संपन्न करण्यात आले . औत्सुक्याने आणि आदराने हा सोहळा जगभर पाहिला जातो .या सोहळ्याचे ऐतिहासिक मूल्य पाहता शिस्तबद्धतेच्या काळजीसह प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक असा हा अभूतपूर्व सोहळा रायगड किल्ल्यावर संपन्न झाला.
मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ' गड किल्ले संवर्धन बा रायगड परिवाराला मोठा प्रेरणादायी, उत्साह ,व सर्वांच्या मनात आनंद वाढवणारा ठरला असून छत्रपती शिवराय हे मनामनात शिवराज्याभिषेक घराघरांत' ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात हा सोहळा साजरा झाला. या सोहळ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे शिवराज्याभिषेक शुभदिनी गडावर बा रायगडच्या सदस्यांना किल्ले रायगडावरती दृष्टीस पडली ऐतिहासिक तोफ ,राज्यभिषेक सोहल्याप्रसंगी तोफ दिसल्याने बा रायगड परिवारात नवा उत्साह व नवं चैतन्य निर्माण झाल्याने शिवप्रेमींचा आनंद गगनाला भिडले असल्याचे दिसून आले व याचे कौतुक छत्रपती संभाजी राज्यांसह पुरातत्व खात्याने व अनेक शिवप्रेमींनी केले.
गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या बा रायगड टीमच्या सदस्याला शिराज्यभिषेकदिनी नजरेस पडलेली तोफ याची माहिती छत्रपती संभाजी राजे व पुरातत्व खात्याला दिली त्याची दखल पुरातत्व विभागाने घेतली तद्नंतर प्रत्यक्षात ही गवसलेली तोफ 3 जुलै रोजी बा रायगड परिवार सदस्यांनी सुरक्षित तिच्या मूळ ठिकाणी महादेव माळ येथे पुन्हा विराजमान करण्यात यश आले आहे त्यांच्या या यशस्वीरीत्या कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीराजेंसह पुरातत्व खात्याने तसेच अनेक शिवप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.
श्री रायगड महाराष्टातील प्रत्येकाचे शक्तीस्थान आहे. बा रायगड परीवारावर विशेष प्रसन्न होऊन या श्रीमद् रायगडाने त्यांच्या या निस्वार्थी पणे कार्य करत असणा-या लेकरांना राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी ६ जुन २०२२ या दिवशी प्रसाद दिला असल्याचे बा रायगड सदस्यांकडून बोलले जात आहे विशेषतः किल्ले रायगडाचा एक अमुल्य असा ठेवा परिवाराच्या मुलांना गवसला एक महाकाय तोफ महादेव माळ येथील दरीत आढळली. ऐतिहासिक नोंदी नुसार महादेव माळ येथे एकूण ४ तोफा होत्या. प्रत्यक्षात मात्र काल पर्यंत तिथे एकच तोफ विराजमान होती तर त्याच ठिकाणी ही गवसलेली तोफ बा रायगड सदस्यांनी यशस्वीपणे विराजमान करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
रविवारी ३ जुलै २०२२ रोजी पुरातत्व विभागातील अधिकारी यांच्या समावेत व मार्गदर्शनाखाली या मोहिमेत ८.३" लांब व १३०० किलो वजन असलेली ही महाकाय तोफ साधारण ६० फुट खोल दरीतून व तीव्र उतारावरून महादेव माळावरती चेन पुली, दोरखंड च्या साहाय्याने ५० बा रायगडच्या मेहनती सदस्यांनी हर हर महादेवाच्या नामघोषात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात सदरची तोफ महादेव माळ येथे तिला विराजमान केले. सकाळी ८ वाजता सुरू केलेली ही मोहीम दुपारी ३ वाजता यशस्वी होऊन थांबली यामध्ये मेहनत केलेल्या सर्व परीवारातील सदस्यांचे या कामगिरीमुळे सर्वत्र खुप खुप कौतुक केले जात आहे. सदर मोहिमेत युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांचे आशिर्वाद , केंद्रीय पुरातत्व विभागाचे श्री. राजेंद्र यादव, श्री. आर. पी. दिवेकर साहेब, श्री. अविराज पवार, श्री. प्रवीण तांबोळी यांचे विशेष सहकार्य लाभले. रायगड प्राधिकरणाचे श्री. वरून भामरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. हे कार्य सिद्धीस जावे ही तर श्रींची इच्छा या उक्तीप्रमाणे वरूनराजाने ही आपले कृपाछत्र धरली असल्याने ही तोफ महादेव माळ येथे सुरक्षित विराजमान करण्यास आम्ही बा रायगड परिवाराचे सदस्य यशस्वी झालो आहोत अशी माहिती बा रायगड परिवाराचे सदस्य मनोज थिटे यांनी दिली आहे.
या मोहिमेत बा रायगड परिवाराचे सदस्य मनोज थिटे, सौरभ घरट, नवनाथ आहेर, संजयदादा करपे, चैतन्य भालेराव, चैत्राली कारेकर, राहुल साबळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली.तसेच रायगडावरील आता पूर्णपणे सुस्थितीत असलेली ही एकमेव तोफ असावी जीची अत्यल्प झीज झालेली आहे. तोफ पूर्ण अवस्थेत असून कसल्याही प्रकारची हानी अथवा ईजा झाली नसल्याचे दिसून येत आहे. रायगड प्राधिकरण आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला विनंती करतो की या तोफेसहित रायगडावरील सर्व तोफांचे जतन संवर्धन योग्यरीत्या व्हावे. ऊन-वारा-पाऊस यापासून यांचे संरक्षण करणेहेतून योग्य ती पावले उचलावी अशी विनंती बा रायगड सदस्यांनी संबधित खात्याला केली आहे.
Comments
Post a Comment