झाडे लावण्यास नाही सीमा! झाडे हाच, जीवन विमा!
रोहाअंधार आळी ग्रामस्थ मंडळाचा वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम,
रोहा (राजेश हजारे ) रोहा शहराचे झपाट्याने होणारे शहरीकरण त्यासाठी होणारी वृक्षतोड मिळेल तिथे इमारती उभ्या करण्याचा सपाटा या सर्व परिस्थितीत रोह्याची निसर्ग संपन्न अशी असलेली ओळख पुसली जाते की काय अशी परिस्थितीत निर्माण होत असताना तसेच जंगल झाडे वाचविण्याची जबाबदारी शासनाची नसून समाज्यातील प्रत्येक व्यक्तीचीही जबाबदारी आहे. या उदात्त भावनेने आज आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त अंधार आळी येथील युवकांनी व जेष्ठ मंडळीं एकत्र येऊन संत तुकारामांच्या अभंगातील वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ही ओळ सत्य रूपात आणत
अंधाराळीयेथील होळीचा माळ या नऊ गुंठे मोकळ्या जागेत कडुलिंब, बदाम, वड, पिंपळ, नारळ, बकुळी, शमी, सोनचाफा, अशा विस झाडांची लागवड करून एक आगवेगळा उपक्रम राबवून निसर्गाला हातभार लावण्याचे महत्वाचे काम या युवा वर्ग व जेष्ठ मंडळींनी करून आजच्या एकादशीचे महत्व विषद केले आहे वृक्ष हाच पांडुरंग त्याची जोपासना, संगोपन हीच भक्ती हा संदेशच जणू अंधार आळी ग्रामस्थानी देऊन आजची देव शयनी एकादशी सार्थ ठरवून एक नवा आदर्श समाजा समोर ठेवून कृतीतून भक्तीचे दर्शन घडविले. या कामी युवकानी मोर्चा सांभाळून जेष्ठ मंडळींनी व महिला वर्गाने या उपक्रमाला साथ देत हा कार्यक्रम यशस्वी केला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिप्रेश सावंत, समिर दळवी, अरुण साळुंखे, नरेश भांबर, सुधीर शिंदे, अजित मालुसरे, रोहित शिंदे, स्वप्नील धनावडे, तूषार पवार, सचिन दळवी, दीपक कोंडे, रोहित दळवी, गावंड, दिलीप बहुतुले, संदेश धनावडे व गजानन दळवी सूर्यकांत शिंदे, नारायण कदम, उदय कोंडे, सचिन कारखानीस, जनार्दन धनावडे स्वप्नील पवार, राहुल भोसले.आदी जेष्ठ ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
रोहा अंधार आळी येथील युवकांनी व ज्येष्ठ नागरिकांनी देवशयनी एकादशीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी वृक्षारोपण करताना अंधारआळीतील महिला मंडळ, (छायाचित्र राजेश हजारे, रोहा)
Comments
Post a Comment