सायबर सुरक्षित, साक्षर गाव, मोहिमेंतर्गत सायबर गुन्ह्यांविषयी समाजात जनजागृती व्हावी म्हणून गोरेगाव पोलिसांचा स्तुत्य उपक्रम!

  विद्यार्थ्यांची रॅली काढून केली जनजागृती नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

रायगड(प्रतिनिधी)सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्याबाबत विद्यार्थ्यांसह नागरिकांसह पुरेपूर माहिती व्हावी त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून गोरेगाव पोलीस ठाण्याचे कार्यतत्व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी तसेच त्यांचे सहकारी यांनी दहिवली कोंड येथे शालेय विद्यार्थी रॅलीचे आयोजन परिसरातील यांची रॅली काढून सायबर जनजागृती करण्यात आली या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत ऑनलाइन व्यवहार पद्धतीकडे जास्त कल दिसून येतो अशा व्यवहारात त्यांची फसवणूक झाल्याचेअनेक प्रकार देखील समोर आले आहेत, आपल्या बँक खात्याबाबत सर्व गोपनीय माहिती काही भामटे माहिती करून घेतात व याचा गैरफायदा काही भामटे घेऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करतात तसेच तरुण-तरुणी आपल्या खाजगी माहिती छायाचित्र समाज माध्यमांवर टाकतात मात्र काही भामटे या चित्रांचा गैरवापर करून त्यांच्याकडून पैसे उकळतात यावर फसवणूक झाल्यास तक्रार कोठे करावी? सायबर गुन्ह्यापासून कसे वाचावे? फसवणूक झाल्यास त्यांनी पोलिसांशी कसा संपर्क साधावा?

 याबाबत मौजे दहिवली कोंड शाळेच्या विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते करण्यात आली यामध्ये गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोळेकर, पोहवा दाभाडे, पोहवा चव्हाण, पो.कॉ मुंडे,पो.कॉ. बोंबले,पो.कॉ सूर्यवंशी, पो.कॉ. चालक पाटील,पो.कॉ. मांडवे,पो.कॉ. साबळे, इत्यादी उपस्थित होते. तसेच दहिवलीकोंड ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामस्थ तसेच दहिवलीकोंड हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व नागरिकांचे फसवणूक होऊ नये यासाठी कसे राहिले पाहिजे आपली जबाबदारी काय? हे कळावे फसवणूक होऊ नये म्हणून दिनांक दहिवली कोंड येथे गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्याचे कार्यतत्व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस नेते श्रीकृष्ण नवले यांनी व त्याच्या सहकारी पुढाकार घेतला असून नागरिकांमध्ये सायबर क्राईम विषयी जनजागृती व्हावी या हेतूने जनजागृती सायबर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  

  गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्याचे वतीने आपले कर्तव्य बजावत असताना अनेक ठिकाणी समाजप्रयोगी कार्यक्रम राबवले जात असून याचा परिणाम समाजात दिसून येत आहे समाजपयोगी कार्यक्रमामुळे गुन्हेगारीचे प्रमाण देखील कमी झाल्याचे दिसून येत आहे सामाजिक कार्यात तसेच संकटकाळी गोरेगाव पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा नेहमी पुढाकार असतो पोलीस व नागरिक यांचे जिव्हाळ्याचे संबध असल्याचे दिसून असून पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा पूर्णपणे बदललेला असल्याचे चित्र गोरेगाव परिसरात दिसते. हे असे अनेक पोलीस ठाण्यामध्ये झाले तर गुन्हेगारीचे प्रमाण निश्चितच कमी होईल गोरेगाव पोलिसांचा हा आदर्श इतर पोलिसांनी घेण्याचे निश्चितच गरजेच आहे. या गोरेगाव पोलिसांच्या स्तुत्य उपक्रम बाबत जिल्ह्यातून गोरेगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog