माझं गाव माझी जबाबदारी ' संस्थेतर्फे वरवठणे येथे करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन!
नागोठणे (प्रतिनिधी)'माझं गाव माझी जबाबदारी ' या सामाजिक संस्थेतर्फे वरवठणे येथे दहावी - बारावी नंतरच्या पुढील शिक्षणाची नेमकी दिशा विद्यार्थी व त्यांच्या पालकांना ठरवता यावी यासाठी निःशुल्क करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत वरवठणे येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ठाणे सेवानिवृत्त केंद्रीय उपायुक्त तथा दैनिक लोकसत्ताचे स्तंभलेखक सुहास पाटील हे विद्यार्थी व पालकांशी सुसंवाद साधणार आहेत. सुहास पाटील हे दैनिक लोकसत्तातील ' संधी नोकरीची ' या स्तंभातून गेली २० वर्षे महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत आहेत. या मार्गदर्शन शिबीरात सुहास पाटील हे प्रामुख्याने दहावी , बारावी व पदवीनंतरच्या करिअरच्या वेगळ्या वाटा , युपीएससी - एमपीएससी , रेल्वे व बॅका यांद्वारे घेतल्या जाणा-या स्पर्धा परीक्षा , स्टाफ सिलेक्शन कमिशन, संरक्षण दलातील नोकरीच्या संधी , विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवले जाणारे नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम , विद्यार्थ्यांसाठी असणा-या शासकीय शिष्यवृत्त्या , इंग्रजीवरील प्रभुत्व व संभाषण कौशल्य, मुलाखतीचे तंत्र, अपयशामुळे येणारा न्यूनगंड , व्यक्तीमत्त्व विकास आदी विषयांवर विद्यार्थी व पालकांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. व्याख्यानाच्या शेवटी विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसनही तज्ज्ञ मार्गदर्शक सुहास पाटील करणार आहेत. या निःशुल्क करिअर मार्गदर्शन शिबीराचा नागोठणे परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ' माझं गाव माझी जबाबदारी ' या सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या शिबिरासंदभातील अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संस्थेच्या पुढील पदाधिका-यांशी संपर्क साधावा : ॲड. किरण कर्जेकर ( ८९२८५ १६३५८ ) , ऋषिकेश कर्जेकर ( ९९७५५ ६२१८५ ) , हर्षल म्हात्रे (.८४४६८ ८२६३१) , रोशन पाटील ( ७९७२२ ८७११३) अतिष सारले ( ८९८३९ २४८३८ ) , राकेश म्हात्रे ( ९८५०१ ८३६९६). असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment