कोलाड हायस्कुल येथील सन१९८७/८८ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांकडून विद्यालयास स्कॅनर भेट

   कोलाड(विश्वास निकम)कोलाड हायस्कूल मधील सन १९८७-८८ मधील दहावीच्या बॅच मधील विद्यार्थ्यांनी,स्नेहबंध म्हणून गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुदक्षिणा म्हणून द. ग. तटकरे उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कुल येथे जाऊन,प्राचार्य शिरीष येरुणकर सर,सदानंद तांडेल सर,उदय घोसाळकर सर,प्रदीप नागोठकर सर,विजय साखरले सर, अविनाश माळी सर व इतर शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत स्कॅनर भेट दिला. यावेळी माजी विद्यार्थी नलिनी जंगम(गुरव), ,प्रमिला गायकवाड(मोरे),जितेंद्र जैन, उद्धव आव्हाड यांनी शाळेत जाऊन स्कॅनर भेट दिला. या दहावी  मधील सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करीत आहेत याचे मुख्य कारण कोलाड हायस्कूल मधील सर्व शिक्षकांनी या विदयार्थ्यांवर चांगले संस्कार व मार्गदर्शन केले होते. १९८७-८८ मधील माजी विद्यार्थी निशिकांत पाटील,अश्विनी भगत, दिलीप पाबरेकर,दिपक जाधव,जितेंद्र घोणे,पंकज साटम, अजित शिंदे, नरेश शिंदे,दत्ता वाचकवडे,छाया येरुणकर,गुड्डी सय्यद, लता दांडेकर,अनिशा पाटील, राजेश सानप ,अनिल महाडिक, सुजाता मोकळ, कांचन विचारे, वंदना गोरिवले, सुजाता दरिफदर, दिपक नागले, बलराज मालुसरे, विनोद सानप, बलराज,पवार,किशोर वडे,सौ.शिंदे, किरण घोरपडे,विश्वास निकम,सुनील काटे,अनिता मेहता,विभावरी , जगदीश परबलकर, ज्योती भोगटे, सुनिल बिरगावले, नितीन पवार,यांच्या वतीने। आपणास घडविणाऱ्या विद्यामंदरात आपण काही तरी फुल ना फुलाची पाकळी भेट वस्तू देऊया असे सर्वांच्या मते ठरविले,व गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांनी आपल्या शाळेत जाऊन भेट देऊन यायचे ठरले परंतु प्रत्येक जन पन्नाशीच्या आसपास असल्याने,आपल्या दैनंदिन कामात गुंतलेला आहे, त्यात मेघराजा जोरदार कोसळत असल्याने काही जण पोहचू शकले नाहीत.परंतु ठराविक माजी विद्यार्थी यांनी सर्वांच्या वतीने भेट वस्तू शाळेत दिली.

Comments

Popular posts from this blog