किरण लडगे यांच्या लक्ष्मी पाईप कंपनीचे कार्य उल्लेखनिय आमदार अनिकेत तटकरे
गोवे-कोलाड ( विश्वास निकम ) सुतारवाडी येथील लक्ष्मी पाईप कंपनीचे मालक किरण लडगे यांच्या लक्ष्मी पाईप कंपनीतून तयार होणारे सिमेंट पाईप हे उत्तम दर्जाचे असून गेली अनेक वर्षे या कंपनी मार्फत उत्पादित होत असलेले सिमेंट पाईप जिल्ह्याबाहेर ही विक्रिसाठी उत्तम दर्जामुळे गेलेले आहेत. लक्ष्मी पाईप कंपनीचे कार्य उल्लेखनिय असल्याचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी हरे कृष्ण कार्पोरेशन सुतारवाडी यांच्या एच.डी.पी.ई. पाईप व पी.व्ही.सी. पाईप सुपर स्टॉकिस्ट नेमणुकीचे सर्टिफिकेट वितरण आणि वितरण विभागाचे उद्घाटन प्रसंगी सांगितले. या वेळी रायगड च्या पालकमंत्री आदिती तटकरे तसेच येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल दळवी, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते कुडली, सुतारवाडी, कोलाड, धाटाव, रोहा, नागोठणे विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते.
किरण लडगे यांनी सुतारवाडी परिसरात लक्ष्मीपाईप कंपनी ही अनेक वर्षापूर्वी सुरु करून स्थानिकांसह अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. या कंपनी मार्फत तयार होणारे सिमेंट पाईप भक्कम, दर्जेदार असल्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मागणी असते.
Comments
Post a Comment