रायगड जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान नाईक यांना पुत्रशोक,
कै.भावेश भगवान नाईक |
रायगड (भिवा पवार ) जिल्हा आदिवासी कातकरी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच आदिवासी समाजाच्या न्याया हक्कासाठी सदैव तत्पर असणारे भगवान नाईक यांचे मोठे चिरंजीवाचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
जिल्हाध्यक्ष भगवान नाईक यांचे मोठे चिरंजीव कै.भावेश भगवान नाईक वय 27वर्षे हे कावीळ या आजाराने त्रस्त होते. दिनांक 20/10/2021 रोजी राहत्या घरी वरंडे पाडा चौल येथे त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 27 वर्षे होते. त्यांचे दिवस कार्य वार शुक्रवार दि.29 /10 /2021रोजी वरंडेपाडा चौल येथे होणार आहेत.
कै. भावेश नाईक यांच्या अकाली निधनाने रायगड जिल्ह्यात आदिवासी बांधवांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज दुःखात सहभागी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील. दोन भाऊ असून या दुःखा बाबत आदिवासी समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment