येरद(शितोळ)आदिवासी वाडीतील 150 आदिवासी बांधवानी घेतली कोवीड लस,

 लसीची कंपनीचे नाव, लसीची मुदत दिनांक, सांगण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांची टाळाटाळ

 संतप्त आदिवासी तरुणानीं लसीकरण थांबविले लसीचे नाव, दिनांक, कंपनीचे नाव विचारले असता पुन्हा  माहिती देण्यास टाळाटाळ, लस बाटलीचे फोटो काढण्यास केली मनाई,

 पत्रकारांनी आरोग्य अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, शिपायाने दिले उद्धटपणाची उत्तरे

 शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मनमानी कारभाराबाबत कर्मचाऱ्यांच्या  कामचुकाराबाबत अनेक तक्रारी,

 आदिवासी बांधव करणार जिल्हा आरोग्य अधिकारी, व  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करणार तक्रार,

 रायगड (भिवा पवार ) याबाबत सविस्तर वृत्त अशी की दिनांक 18 ऑक्टोबर रोजी माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील येरद  (शितोळ) आदिवासी वाडीवर प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवली यांच्या वतीने कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अंगणवाडी सेविका,सुजाता साबळे, आशा सेविका,अपर्णा दबडे, किर्लोस्कर,व अन्य आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी होते येरद शितोळ  या आदिवासीवाडीतील  तरुणमंडळाचे अध्यक्ष तसेच रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे निजामपूर विभागअध्यक्ष व वन मित्र राम कोळी यांनी सदर आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण कोणती लस देताय? त्यांचे नाव काय? दिनांक मुदत कधी संपणार आहे याबाबत उपस्थित आदिवासी ग्रामस्थांना माहिती द्यावी विनंती केली.

 मात्र ही माहिती देण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांनी विरोध केला व उडवाउडवीची उत्तरे दिली लसीकरण 50% झाल्यानंतर सदर येरद (शितोळ)  ग्रामस्थांनी पुन्हा मागणी केली. आम्हास दिलेली लसीचे  नाव, कंपनीचे नाव मुदत कधी संपणार,आहे त्यावर माहिती मागितली मात्र पुन्हा सदर आरोग्य कर्मचाऱ्यांनी माहिती दिली नाही मात्र येथील आदिवासी युवकाने फोटो काढला असता त्या संबंधित  तेथील एका उर्मट आरोग्य कर्मचारी महिलेने तो फोटो डिलीट करण्यास सांगितले मात्र यावर आदिवासी बांधवांच्या मनात अधिकच संशय निर्माण झाला. 

 येथील  ग्रामस्थांनी झालेल्या प्रकाराबाबत पत्रकारांना फोनवरून माहिती दिली, असता पत्रकारांनी आदिवासी ग्रामस्थ व कार्यकर्त्यांना माहिती का देत नाही? विचारणा केली असता सदर नर्सने वरिष्ठ कर्मचारी शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरेश गावल यांचे यांचा फोन नंबर दिला यांच्याशी संपर्क साधाला असता  आरोग्य कर्मचारी सुरेश गावल यांच्याशी  साधला असता आम्हाला माहिती देण्यास अधिकार नाही. तो आमचा प्रोटोकॉल नाही असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देता येत नाही असे सांगितले. तसेच वरिष्ठांचे फोन मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली.

 शिरवली आरोग्य प्राथमिक केंद्रातील शिपाई करतो पत्रकारांना उद्धटपणाची भाषा

 तसेच या आरोग्य केंद्रातील कर्मचारी शिपाई वामन काटकर याने सदर फोन करून या पत्रकारांना फोन करून तुम्ही पत्रकार राष्ट्रपती आहेत का? तुम्ही आमचे काय वाकडे करणार आहे? असे सांगून पत्रकारांना आग लावल्या शिवाय जमत नाही का असे सांगून उद्धटपणाची उत्तरे दिली याबाबत वरिष्ठ अधिकारी डी. एच. ओ. डॉक्टर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे मोबाइल बंद असल्याचे जाणवले

 लस कोणती देत आहेत ? कंपनीचे नाव काय? मुदत कधी संपते हे विचारणे याची माहिती असणे आमचा हक्क आहे:राम कोळी

 आदिवासी समाज कोवीड लस घेण्यास  लगेच तयार होत नाही  लसीबाबत तो अज्ञभिज्ञ् असून त्यांच्या मनात भीती आहे.त्यांना माहिती देऊन  आम्ही लस घेण्यासाठी त्यांना परावृत्त करत आहोत. समाजाचा घटक व अध्यक्ष या नात्याने माझ्या समाजाला कोणती लस दिली. कंपनीचे नाव? त्याची मुदतीची तारीख हे प्रमुख म्हूणन जाणणे जरुरीचे आहे तो आमचा नैतिक अधिकार असून आम्ही तो मागितला तर आम्हाला देण्यास तो टाळाटाळ का? केला जातोय याचे कारण गुलदस्त्यात असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची तक्रार करणार असल्याचे वन मित्र राम कोळी यांनी व   ग्रामस्थांनी पत्रकारांना सांगितले.

 प्रकरण तापल्या नंतर संध्याकाळी 4:30 वाजता लसीच्या बाटलीवरील इंग्रजीतील नाव  वाचून न दाखविता बाटल्या टेबलावर ठेवून अशिक्षित आदिवासी आदिवासी बांधवाना  वाचण्यास सांगितले फोटो काढण्यास सक्त मनाई करण्यात आली.

 यावेळी आदिवासी समाजाचे कार्यकर्ते तसेच दक्षिण रायगड आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव संतोष वाघमारे केशव वाघमारे या कार्यकर्त्यांनी हे कार्यकर्ते घटनास्थळी4:30वाजता भेट दिल्यानंतर या उपस्थित कर्मचाऱ्यांनी फक्त बाटलीवर  नाव, दिनांक, वाचून न दाखविता. रिकाम्या बाटल्या टेबलावर  ठेवण्यात आल्या व अशिक्षित आदिवासी बांधवांना वाचण्यास सांगितले. अशिक्षित आदिवासी बांधव इंग्रजीतील अक्षरे वाचणार कसे?    फोटो हि काढण्यास  स्पष्ट  मनाई आली याबाबत कारण अद्याप यामधील न समजल्याने परिसरातील आदिवासी समाजात संशयाचे वातावरण पसरले आहे

 शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशीची मागणी मागणी 

 या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात 30 आदिवासी वाड्यावर 40 गावे असून या प्राथमिक आरोग्य केंद्र बाबत तसेच येथील कर्मचारी वर्ग बाबत नाराजी व्यक्त केली जात असून या आरोग्य केंद्रातील कर्मचारी आदिवासी समाजाची नेहमी हेळसांड करतात  उपचार करण्यास नेहमी टाळाटाळ  करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

 शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कामचुकार,असल्याची चर्चा, येथील शिपाई ची 20 वर्षात बदली नाही,

 या आरोग्य केंद्रातील डॉक्टर सुद्धा पंधरा पंधरा दिवसांनी हजर राहत असल्याची चर्चा होत आहे अन्य कर्मचारी आलटून-पालटून येत असल्याची चर्चा असून येथील शिपाई हा वीस वर्षे एकाच आरोग्य केंद्रात नोकरी करत असून सदरील कामचुकार कर्मचारी यांची बदली अधिनियमा कायद्या नुसार बदली का होत नाही याबाबत परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून येथील शिपाई याला राजकीय लोकांचे वरदहस्त असल्यामुळे तो दादागिरी करतअसून या वरदहस्तामुळे त्याची बदली होत नसल्याची चर्चा आहे. तो स्वतःला डॉक्टर ही समजत असल्याचे चर्चा होत आहे. 

 शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांच्या  वर्तनाबाबत आंदोलन करणार:उमेश जाधव

 शिरवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारी वारंवार येत असून येथे आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड  केली जात असून लसीकरणा च्या वेळी आदिवासी बांधवांना दिल्या गेलेल्या लसीचे नाव त्यांची

 मुदत, दिनाकं कंपनीचे नाव याची माहिती मिळायलाच पाहिजे. या कृत्याबाबत आदिवासी बांधवांचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती रायगड जिल्हा हित रक्षक आदिवासी संघटना अध्यक्ष उमेश जाधव यांनी दिली.

 लसीच्या बाटलीवरील नाव, दिनांक, शिरवली आरोग्य केंद्राच्या प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी का सांगितले नाहीत याबाबत आदिवासी समाजात नाराजी तसेच संशयाचे व भीतीचे  वातावरण पसरले आहे.


Comments

Popular posts from this blog