रोहा तालुक्यातील कवळटे आदिवासीवाडी ग्रामस्थ्यांचे पुनर्वसन करावे आदिम जमात कातकरी समाज संघटनेकडून तहसीलदारांना निवेदन

रायगड (भिवा पवार )जंगल दऱ्यांमध्ये राहणारा आदिवासी समाज आज देशाचा मूळ मालक आहे. मात्र या देशाचा मूळ मालक असून सुद्धा आज येथील आदिवासींना राहण्यासाठी जागा मिळत नाही तो बेघर झाला आहे  ही शोकांतिका आहे.  देश स्वतंत्र होऊन 74 वर्षे झाली तरी आज आदिवासी समाज हलाखीचे जीवन जगत आहे. आदिवासीना हक्काची जागा मिळावी विविध शासनाच्या योजना मिळून ती आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनावे यासाठी  रोहा  तालुक्यातील कवळटे आदिवासीवाडी येथील लोकांचे पुनर्वसन करून त्यांना शासनाच्या विविध घरकुल सारख्या योजना मिळाव्यात म्हूणन तालुका रोहा  आदिम जमाती कातकरी समाज  संघटनेकडून रोहा तहसीलदार कविता जाधव यांना संघटनेच्यावतीने  निवेदन देण्यात आले.

    यावेळी रोहा तहसीलदार कविता जाधव, यांनी कवळटे आदिवासीवाडीचा  पुनर्वसनाचा विषय लवकरच मार्गी लावण्याचे अभिवचन दिले. यावेळीं आदिम जमात कातकरी समाज संघटना रोहा अध्यक्ष श्री पांडुरंग वाघमारे, सर्वहारा जनआंदोलन संघटनेचे  कार्यकत्ते अंकुश वाघमारे आदिम  संघटना रायगड जिल्हाअध्यक्ष श्री लहु वाघमारे, सल्लागार सुरेश वाघमारे, तसेच कवळटे आदिवशीवाडी ग्रामस्थ चंदर जाधव ,किसन जाधव, रामचंद्र पवार, संतोष वाघमारे ,नथुराम वाघमारे, उपस्थिति होते.

Comments

Popular posts from this blog