समाजसेवक निलेश भाई महाडीक यांच्या तर्फे कोलाड कुष्ठरोगी रूग्णांना फळे  वाटप,

      गोवे-कोलाड(विश्वास निकम )

                 पुई येथील समाजसेवक व युवा नेते निलेश भाई महाडीक यांनी रविवार दि.२४ ऑक्टोबर २०२१रोजी कोलाड येथील कुष्ठरोगी दवाखान्यात सदिच्छा भेट देऊन तेथील रुग्णांना नेहमी प्रमाणे फळांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जोपासून तसेच समाजकार्यातून त्यांचे हे कार्य अतिशय उत्कृष्ठ आहे.समाजातील गरजु नागरिकांसाठी त्यांचे मद्दतीचा हात नेहमी तत्परतेने पुढे असुन त्यांच्या या कार्याबद्दल कुष्ठरोगी दवाखान्यातील मा श्री, दिपक भोसले यांनी त्यांचे आभार मानले, 

         यावेळी या फळे वाटप कार्यक्रमात समाजसेवक युवा नेता निलेशभाई महाडिक,ईकिदंर शेवाळे,गौरव नाईक,संजय कणघरे, राजु सुतार,सचिन सागळे,महेश अधिकारी, यांच्यासह कोलाड कुष्ठरोगी दवाखान्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog