पुगाव शिव मंदीर व ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

                   गोवे कोलाड ( विश्वास निकम  )  

              श्री.कमलेश्वर शिवमंदिर व पुगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्राम पंचायत पुगाव शनिवार दि .०९/१०/२०२१ रोजी सांयकाळी ठीक ४.०० वाजता शैक्षणिक वर्ष २०२०/२१ मध्ये आपल्या गावातील इयत्ता १०वी आणि १२वी मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

                 पुगाव ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक कळागुणांना वाव मिळावा म्हणून अनेक वर्षांपासून गुणगौरव सोहळा मोठया कार्यक्रमात आयोजित करण्यात येतो परंतु कोरोना विषाणूमुळे दोन वर्षापासून धार्मिक उत्सव या कार्यक्रवर बंदी घालण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा न थांबता तो मोजक्याच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरु आहे ही कौतुकास्पद उपक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात इयत्ता १० मधील १७ व बारावी मधील १५ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

  यावेळी सौ.नेहा म्हसकर सरपंच पुगाव,श्री नारायणराव धनवी, श्री बबन म्हसकर, श्री सुधीर शेळके, सौ आदिती झोलगे, सौ.अनिता खामकर, सौ.निशिगंधा कळमकर, सौ पल्लवी धनवी-सरोदे शासकीय आधिकारी, श्री विट्टल येळकर निवृत्त शिक्षक, श्री सुभाष देशमुख, श्री राजेंद्र धनवी सिप्ला कंपनी डायरेक्टर, श्री काशीराम देशमुख, श्री राजेंद्र निळेकर, श्री चंद्रकांत आधिकारी प्राध्यापक,ग्रामस्थ व पालक वर्ग हे उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog