रोहा अष्टमी त्वष्ठा कासार समाजाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास वडके यांचे निधन
रोहा (राजेश हजारे) रोहा अष्टमी त्वष्ठा कासार समाजाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास चंद्रकांत वडके यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निवासस्थानी निधन झाले ते 71 वर्षांचे होते. बांधकाम क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन केले होते. त्वष्ठा कासार समाजासाठी त्यांचे फार मोठे योगदान आहे. ते रोहा - अष्टमी सहकारी बँकेचे पदाधिकारी होते उत्कृष्ट पेटी वादक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजसेवेचे व्रत अंगी करून संगीत भजन आधी छंद जोपासून लोकांना काही चांगले देण्याचा ती नेहमी प्रयत्न करत असायचे रोह्यातील तील अनेक भजनी मंडळा मध्येही पेटी वादक म्हणून त्यांनी काम केले. अत्यंत शांत स्वभाव अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात, त्यांनी उल्लेखनीय काम केले एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीनिवास वडके त्यांच्या अचानक जाण्याने अष्टमीकरांना मोठा धक्का बसला असून भजनी मंडळातील सदस्य हळहळ व्यक्त करीत आहेत. श्रीनिवास वडके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे त्यांच्या निधनाने रोहा अष्टमी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment