तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण?
ग्राम सभा ठराव नसतांना शासकीय इमारत पाडली,कोण करणार कारवाई?
कोलाड (श्याम लोखंडे )रोहा तालुक्यात अनागोंदी कारभारात ऐनघर ग्राम पंचायत पाठोपाठ आता तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायत पुढे असल्याचे संकेत मिळत असून चक्क सदरच्या ग्राम पंचायतीत कोरोना काळात गेली दोन वर्षे कोणतीही ग्राम सभा नाही याचा सरास थेट सरपंच गैर फायदा घेत अनागोंदी कारभार करत असल्याचे समोर आले असून चक्क कामाचा व तसेच जुनी शासकीय इमारत पडण्याचा कोणताही ठराव नसताना या ठीकाणी असलेली जुनी ग्राम पंचायत इमारत पडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून चालत असलेल्या हुकूम शाही आणि आनागोंदी कारभाराला जबाबदार कोण ? यावर कोणाचे नियंत्रण आणि कोण कारवाई करणार असे तर्क वितर्क केले जात आहेत,
या बाबत हाती आलेल्या माहिती नुसार सदरच्या ग्राम पंचायतीत पंचायत मालकीची जुनी असलेली इमारत नंबर १११ सदरच्या सदस्यांना विश्वासात न घेता तसेच कोणत्याही ठरावाची मंजुरी नसतांना व त्यातच शासनाची परवानगी ही इमारत एका खाजगी कामाच्या हव्यासापोटी तोडली आहे असे सर्वत्र बोलले जात आहे तसेच या इमारतीत काही शासकीय कागदपत्रे व शासकीय वस्तू यांची देखील नासधूस झाली आहे त्याच बरोबर कार्यरत असलेल्या उपसरचं सौ मानसी लोखंडे,सदस्या सौ सरोजनी मरवडे,सौ रिया लोखंडे,व शांताराम महाडिक ,यांनी याबाबत पंचायत समिती रोहा यांचे कडे तसेच संबधित पोलीस ठाणे कोलाड यांचेकडे ताबडतोब रीतसर लेखी तक्रार अर्ज दाखल केला असून यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे समोर येत अधिक सदरच्या ग्राम पंचायत मध्ये अनागोंदी कारभार चालत असल्याचे बोलले जात आहे,
तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या कारभारात अनागोंदी कारभार चालत असून कोणत्याही कामांचा ठराव न घेता राजरोस पणे कामे केली जात असून त्या कामांचे निकष काय ते कोणत्या दर्जाची केली जातात तसेच कोरम पूर्ण नसतांना मासिक सभेत ठराव मंजूर केला जात आहे गैर हजर सदस्यांच्या खोट्या सह्या केल्या जातात याला जबाबदार कोण त्याच बरोबर ग्राम पंचायतीची शासकीय जुनी इमारत कोणताही ठराव न घेता ही इमारत पडण्याचा अधिकार काय याची तसेच चौदा वित्त आयोगातून केलेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाही करण्यात यावी,अशी मागणी उपसरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्य सौ सरोजनी मरवडे,रिया लोखंडे,व शांताराम महाडिक यांनी केली आहे,
दिनांक २७ जुलै २०२१ रोजी वरील ग्राम पंचायतीतील उपसरपंच सौ मानसी लोखंडे ,सदस्य सौ सरोजनी मरवडे,रिया लोखंडे व शांताराम महाडिक यांनी या बाबत तक्रारी अर्ज केला होता यात इमारत नंबर १११ ही सदरच्या ग्राम पंचायत मालमत्तेची त्य कोणताही ठराव न घेता ही इमारत तोडण्यात आली आहे सदर यावर तक्रार अर्जाची चौकशी कार्यालयाचे विस्तार अधिकारी जी एल वायळ यांनी ता.६ऑगस्ट२०२१रोजी केली असून ही शासकीय इमारत असल्याने ती तोडण्याबाबत कोणतीही परवानगी न घेता केलेली कार्यवाही ही अयोग्य आहे त्यामुळे संबधिताविरोधात महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम (१९५९ मुबंई अधिनियम क्र ३)चे कलम ४५ नुसार ग्राम पंचायतीचे प्रशाकीय अधिकारी व कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी ही ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्राम सेवक यांची असल्याने सदरबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अनिकेत पाटील गट विकास अधिकारी रोहा
कोरोना काळात कोणतीही ग्राम सभा नसल्याने रोहा तालुक्यात अनेक ग्राम पंचायत विभागात गाव पातळीवरील विकास कामात थेट सरपंच कारकिर्दीत अनोगोंदी कारभार होत असल्याचे सर्वत्र बोलले जात असून काहींची तर आजतागायत चौकशी देखील होत नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे केंद्र सरकारच बोध वाक्य सबके साथ सबका विकास मात्र काही ठिकाणी ग्रामस्थ तर सोडाच तर ग्राम पंचायत सदस्यांना देखील विश्वासात न घेता अनागोंदी कारभार सुरू आहेत याला जबाबदार कोण ?असा संतप्त सवाल उठत आहे.
Comments
Post a Comment