आमडोशी येथील श्री समर्थ कृपा बचत गटाचा रांगोळी व्यवसाय, ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद

    गोवे-कोलाड (विश्वास निकम)    रोहा तालुक्यातील आमडोशी येथील श्री. समर्थ बचत गटाचा विविध सण उत्सवासाठी नेहमी व्यवसाय सुरु असतो रक्षाबंधन साठी राखी बनवणे, लग्न समारंभ यासाठी पापड, लोणचे,विविध वस्तू,कोरोना काळापासून मास्क बनवून विविध संस्थेला विक्री करणे असे विविध उपक्रम या श्री समर्थ कृपा बचत गटाचा उपक्रम वर्षभर सुरु असतो याचप्रमाणे सद्या दिवाळी साठी लागणारे विविध प्रकारच्या कलरच्या रांगोळी बनवून त्या विक्री साठी उपलब्ध आहेत.

       रोहा तालुक्यातील आमडोशी येथील श्री समर्थ कृपा संयम साहय्यता बचत गटाच्या विविध प्रकारच्या व्यवसायामुळे मागील वर्षी या बचत गटाचा रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. यामुळे रोहा तालुक्यातील इतर बचत गटांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. या विविध व्यवसायासाठी आमडोशी येथील श्री समर्थ कृपा बचत गटाचाअध्यक्षा, संपदा जांबेकर,उपाध्यक्षा रसिका गोळे,सचिव दिक्षीता जांबेकर.सिआर पी दीपाली गोळे,बँक सखी वर्षा जांबेकर,अपर्णा जांबेकर ,वृषाली जांबेकर ,साधना जाधव, रोहिणी गोळे, कविता जांबेकर,पूजा जाधव, शकुंतला जांबेकर, व बचत गटाचे सर्व सदस्य विविध स्थरावर उपक्रम राबवण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog