चिरंजीवी संघटनेच्या माध्यमातून माणगाव मध्ये शाळा कॉलेजमध्ये बालमजुरी बालभिकारी, बालविवाह बाबत जनजागृती
माणगाव (प्रतिनिधी )चिरंजीवी संघटना ही जिज्ञासू बालकांची मानवतावादी संघटना आहे असून संघटना बालमजुरी,बालभिकारी, बालविवाह आणि बाल लैगिंक शोषण अशा अनेक विषयांवर गेली ८ वर्षांपासून काम करत आहे.
दिवाळी मध्ये सर्वच फटाके फोडतात.पण फटाके बनवण्यासाठी लहान मुलांचा-मुलींचा वापर करून त्यांचे आयुष्य संपवत असतात.ह्यासाठीच वेगवेगळ्या विभागांमध्ये, शाळा-कॉलेजांमध्ये जाऊन मुलांमध्ये जनजागृती करत, आम्ही फटाके फोडणार नाही फोडू देणार नाही असा नारा देतो.असे संघटनेच्या राष्ट्रीय सचिव श्वेता पाटील यांनी सांगितले.
या मध्ये ग. रा. मेहता शाळा, द.ग.तटकरे महाविद्यालयात त्याचबरोबर जुन्या माणगाव मधील विविध आदिवासी पाड्यात देखील हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे संघटनेचे भार्गव पाटील यांनी सांगितले.
फटाक्यांचे दुष्परिणाम सांगितले त्याचबरोबर फटाक्यांमुळे प्रदूषणाची समस्या वाढत आहे.फँक्ट्ररी मध्ये काम करणाऱ्या मुलाचे शिक्षण थांबते हे सांगितले गेले आहे.त्याना बालमजुरी करण्यासाठी प्रवृत्त करतात.आणि त्याना भीक मागण्यासाठी लावले जात होते ही माहिती संघटनेच्या राज्याध्यक्ष नेहा भोसले यांनी मुलांना दिली.
Comments
Post a Comment