माणगावमध्ये गोरक्षा व गोसंवर्धन समितीची स्थापना 

अध्यक्ष पदी ॲडव्होकेट अनिकेजी ठाकूर यांची एकमताने निवड     





    माणगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी माणगाव व तळा तालुक्यात गोमाता व गोवंश हत्या झाल्या होत्या.त्यावेळी संपूर्ण माणगाव तालुक्यातून पक्षभेद व पंथभेद विसरून केवळ हिंदूत्व म्हणून संपूर्ण माणगाव तालुक्यातील हिंदू समाजाने गोवंश हत्या करणाऱ्यावर शासनाने व प्रशासनाने कठोर कारवाई करावी म्हणून मोठे आंदोलन केले होते. त्याची व्यापकता वाढावी व संपूर्ण तालुक्यातील गोमाता व गोवंश हत्या थांबावी याकरिता माणगावमध्ये गोरक्षा व गोसंवर्धन समितीची स्थापना करण्यात आली खरे मंगल कार्यालयात झालेल्या या सभेसाठी सर्वपक्षिय कार्यकर्ते ३५ गोरक्षक उपस्थित होते. यामध्ये गजानन आधिकारी,सुजित शिंदे ,रा.स्व . संघ रायगड जिल्हा सहकार्यवाह प्रशांत ढेपे आदी मान्यवरांसह अनेक सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.

       या समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते ॲडव्होकेट अनिकेतजी ठाकूर यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी अण्णा कोदे,सरचिटणीस पदी संजोग मानकर ,प्रदिप कदम सहसचिव पदी योगेश पालकर ,प्रचार व प्रसिद्धी पदी प्रमोद जाधव ,भिवा पवार ,राजन पाटील तर सदस्य पदी गणेश पवार ,अक्षय खेडेकर ,राजेश महाडीक ,नरेश आधिकारी ,ज्ञानेश्वर उतेकर ,विशाल पाशिलकर,चंद्रकांत आधिकारी ,निलेश पवार कृतेश घोले ,उदय लाड ,जगदीश जाधव, , ॲडव्होकेट लक्ष्मण शिंदे,प्रसाद जाधव ,अरूण जोशी ,प्रथमेश जाधव , गडसंवर्धक रामजी कदम ,विनय इंगळे आदी गोरक्षक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog