ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी भाजपा  कटिबद्ध :-  आमदार ठाकूर प्रशांत ठाकुर

रोहा देवकान्हे येथील शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपामध्ये जाहिर पक्ष प्रवेश

कोलाड (श्याम लोखंडे ) आपल्या संपूर्ण परिसराला निसर्ग उत्तम साथ देत आहे. मोठ्या प्रमाणावर भरपूर पाऊस पडत आहे. अशी परिस्थिती असुनदेखील  शेतकऱ्यांची बिकट  परिस्थिती का  निर्माण झाली आहे. आज  शेतीसाठी उपयुक्त असलेले काळवे कोरडे पडलेले दिसत आहेत . अनेक योजना राबविल्या जात आहेत  परंतु आमचे कर्मदरिद्री पणा असा आहे की,  संबंधित खात्याचे मंत्री  मलई ओरबडून खातात त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पाणी देण्याऐवजी त्यांच्या वाट्याला डोळ्यात अश्रू  येत आहेत , त्यामुळे आज तुमच्या आमच्या पैकी कुटुंबातील लोकांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते .आज आमच्या हक्काच्या पाण्याबरोबरच विविध शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता आला असता तर आज आम्ही नशिबाचे स्वामी असतो. परंतु दुर्देवी असे ज्यांच्यामुळे ही आज परिस्थिती ओढवली ते राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना  व  काँग्रेस वाले गोरगरीब जनतेला विकासापासून वंचित ठेवाण्याचे काम करीत आहे. फक्त  पक्षपाती कारभार करून भावकी गावकीत भांडण लावून द्यायचे त्यांना कोणत्या ना कोणत्या भ्रमात ठेवायचे ,गावातील असणाऱ्या समस्या आपोआप समोर येणार नाहीत हे आता कदापि शक्य नाही.

भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही  त्यामुळे ग्रामीण भागातील तुमच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप नेहमीच कटिबद्ध राहील असे प्रतिपादन आ प्रशांत ठाकूर यांनी देवकान्हे येथील शिवसेना व राष्ट्रवादी चे कार्यकर्त्यांनी गुरुवार दि. 26 मे रोजी भाजप पक्षात भव्य दिव्य पक्षप्रवेश केले या प्रसंगी केले .

रोहा तालुक्यातील देवकान्हे येथील राष्ट्रवादी व शिवसेनेचे नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी भाजप च्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून दक्षिण रायगड भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली रोहा येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रमात आ.प्रशांत ठाकूर बोलत होते.दरम्यान यावेळी महाविकासआघाडी सरकारचा आ. ठाकूर यांनी खरपूस समाचार घेत सांगितले की , सत्ताधारी पक्षातील नेते केवल  भ्रष्टाचाराचे धडे  गिरवताना दिसत आहेत . आधी भ्रष्टाचार किती केला होता त्याच्या मोबदल्यात जागा , बंगले किती घेतले होते त्यापेक्षाही जास्त  भ्रष्टाचार करुन  जमिनी हडप करता  येतील यात मंत्री  मग्न आहेत . आधी भ्रष्टाचार करायचा आणि बोट मात्र  केंद्राकडे दाखवायचे  आम्हाला  सरकारी यंत्रणेचा वापर करून कोंडीत पकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.  आम्हाला भ्रष्टाचार करून देत नाहीत बघा या  शिवसेना , राष्ट्रवादी,  काँग्रेस त्यांच्यावर किती हा अन्याय ?  परंतु भाजपाचे बांधिलकी ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची आहे.  केंद्र शासनाने गोरगरीब जनतेस  शेतकरी सन्मान , उज्वल गॅस ,  घरकुल योजना ,  गावा गावात घरा घरामध्ये नळ पाणी योजना  यासारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत.  याचा लाभ मिळुन देण्यासाठी भाजपा  या पुर्वी देखील कटिबद्ध होत या पुढे राहिल अशी ग्वाही दिली .

यावेळी खरपूस समाचार घेत विकासाचा पाढा वाचत पुढे म्हणाले की तुमचा सरपंच यांना सांगा की आपल्या ग्रामपंचायतीच्या अकाउंट मध्ये  जो विकासासाठी थेट  पैसा येतो तो केंद्र शासनाच्या माध्यमातून येतो . त्यामुळे सर्व घटकांना न्याय देणारा , सर्वाना सोबत घेऊन चालणारा  विकासाला चालना देणारा पक्ष म्हणजे भाजपा आहे : दक्षिण रायगड  जिल्हाध्यक्ष  अँड  महेश मोहिते युवा मोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाग , रोहा  तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर,  युवा मोर्चा रोहा तालुका अध्यक्ष राजेश डाके , जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष निमिश  वाघमारे,  तलवली सरपंच रघुनाथ कोस्तेकर, कामगार आघाडी अध्यक्ष विलास डाके,  जिल्हा चिटणीस नरेश कोकरे,  युवा मोर्चाचे  सरचिटणीस दीपक भगत , धाटाव  विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, भाजपा नेते  आनंद लाड, नागोठणे अध्यक्ष मोदी,  महिला जिल्हा  उपाध्यक्ष श्रद्धा कुंटे,  महिला चिटणीस श्रद्धा घाग,  उपसरपंच वेदिका डाके,  रोहा तालुका महिला अध्यक्षा जयश्री भांड यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog