अपेक्षा,लोभ सांडून भक्ती केली तर ती भक्ती यशापर्यंत नेते :- ह.भ.प. रामदास महाराज पाटील

गोवे-कोलाड (विश्वास निकम) सर्व प्राणी मात्रात माणूस हा असंतुष्ट प्राणी आहे.फक्त बोलायला आहे.समाधान सोडून बोला, वाढलेल्या अपेक्षा, वाढलेला लोभ, यामुळे तो यशापर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे जर अपेक्षा,लोभ,सांडून भक्ती केली केली तरच ती भक्ती यशापर्यंत नेते असे मत रायगड भूषण ह.भ.प. रामदास महाराज पाटील यांनी वागणी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.

भक्ती आम्ही केली सांडूनी  उद्वेग l पावलो हे सांग सुख याचे ll१ll आंम्हा जाले धरिता यांचा  संग l पळाले उद्वेग सांडूनिया ll२ll तुका म्हणे सुख बहू जाले जिवा l पडली या सेवा विठोबाची ll३ll या जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे रोहा तालुक्यातील रायगड भूषण ह.भ.प दळवी महाराज गुरुजी यांच्या अमृतमोहोत्सवा कार्यक्रमा निमित्त आयोजित किर्तनरुपी सेवेतून ते प्रबोधन  करत होते .

         ३७३ वर्षापूर्वीचा काल त्या काळात प्रबोधन संत तुकाराम महाराज यांचे होते. तर प्रशासन शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे होते.तेव्हा समृद्धी कारण होते  म्हणजेच प्रबोधन कर्ते व प्रशासनकर्ते एकत्र येऊन हातात हात घालून काम करतात तेव्हा त्या राज्याची समृद्धी काही दिवसात काही महिन्यात होते.भक्ती ही आपल्याला साध्य पर्यंत पोहोचवतो.याप्रमाणे ह.भ.प. दळवी महाराज गुरुजी (आण्णा ) यांनी स्वतःला मोठे करण्याच्या ऐवजी दुसऱ्याला मोठे केले. त्यांनी मुलांसाठी राजवाडा बांधला नसेल, सुंदर घर बांधला नसेल परंतु त्यांच्या आंमृतमोहोत्सवाला २५ किर्तनकार तसेच विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी त्यांच्या या आयोजित कार्यक्रमात सदिच्छा व शुभेच्छा दिल्या ही खरी आण्णांची मोठी श्रीमंती असल्याचे उपस्थित भक्तगणांना पटवून दिले.

    मोठ्या उत्साही आणि आनंददायी वातावरणात संपन्न झालेल्या या अमृतमहोत्सवा प्रसंगी यावेळी रायगड भूषण ह.भ.प. मारुती महाराज कोल्हाटकर,ह.भ.प.शेळके महाराज,ह.भ.प यादव महाराज,हिराजी महाराज शिंदे, बबन महाराज वांजले,वामन महाराज लाड, शिरसे महाराज,गजानन महाराज बलकावडे,एकनाथ रेडेकर महाराज,शहासने महाराज,नरेश महाराज,जाधव,बामुगडे महाराज,अनिल महाराज सानप,भगवान महाराज कदम, थिटे महाराज, सदानंद गायकर,पांडुरंग गायकर,रामचंद्र चितळकर, शिवराम शिंदे,भाई टक्के,मधुकर ठमके गायनाचार्य रविंद्र मरवडे,तानाजी लाड, विलास चेऊळकर तुकाराम राणे महाराज,गजानन महाराज कदम, रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील  राजकीय, सामाजिक क्षेत्रातील असंख्य नागरिक,महिला वर्ग, तरुण वर्ग व समस्त वांगणी ग्रामस्थ उपस्थित होते.

     ह.भ.प. दळवी महाराज दळवी गुरुजी यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त सकाळी ७.०० वा.मंगळस्नान ८ ते १२ शांतीयज्ञ,४ते ५ सामुदायिक हरिपाठ,५ ते ७ हरिकीर्तन,७.०० वा. आमृत वर्षाचे औक्षण, साखर तुला, व दिप प्रजोलन नंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत, विशेष म्हणजे दळवी महाराज यांचे आमृतमहोत्सव वर्षात वय ७५ वर्षे, तुला केल्यानंतर वजन ही ७५ किलो,७५ दिव्यांनी औक्षण असा त्रिवेणी संगम साधणारे भाग्यवान माणूस म्हणजे आण्णा, सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी सुख निवासी अलिबागकर महाराज प्रेम वर्धक वारकरी संप्रदाय, ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने व सर्व कुटूंबाच्या योगदानातून सर्व कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog