रोहा सांगडे येथील मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद 150 हुन अधिक रुग्णांनी घेतला लाभ,
निदानावर केले जाणार मोफत उपचार!
खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील सांगडे येथे लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा ,पनवेल हॉस्पिटल पनवेल, तक्षशिला बौद्ध विकास संघ सांगडे यांच्या विद्यमाने व ग्रामस्थ महिला व युवक मंडळ सांगडे यांच्या सहकार्याने तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते याला येथील रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात 150 हुन अधिक रुग्णांची तज्ञ डॉक्टरांच्या वतीने मोफत तपासणी करण्यात आली तर पिवळे व केसरी रेशनकार्ड धारक यांच्या निदानावर पनवेल हॉस्पिटल पनवेल यांच्या मार्फत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जाणार आहेत .
भगवान गौतमबुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताचे औचित्य साधून सर्व आजारांवर विशेषतः स्रियांच्या विविध आजारांवर आयोजित केलेल्या या मोफत शिबिरात रक्तातील साखरेचा प्रमाण व ब्लेड प्रेशर तसेच महिलांच्या विविध आजारांच्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मोफत तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्यावर मोफत उपचार केले जाणार आहेत.
यावेळी लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहा चे अध्यक्ष डॉ सागर सानप,सेक्रेटरी रविंद्र लोखंडे,खजिनदार डॉ श्यामभाऊ लोखंडे,लायन नितेश शिंदे,महेश तुपकर, सौ पूजा लोखंडे ,डॉ फरीद चिमावकर,पनवेल हॉस्पिटल पनवेल चे डॉ. किरण अहिराव, डॉ. पूजा जाधव, डॉ रामदास घुले, नर्स श्रुती वरसोलकर, शेवती दिवर.तक्षशिला बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष शिंदे सह आदी सांगडे ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते .
सदर आयोजित शिबिरात महिलांची सर्व साक्षरण तपासणी यात स्त्री तज्ञ डॉ पूजा जाधव यांनी मासिकपाळी संबंधी समस्या,कंबरदुखी ,सफेदपाणी धुपनी, अतिरक्तस्राव , पोटदुखी ,गर्भाशयाचे आजार व सूज,गर्भाशयातील ट्युमर तसेच तोंडावरील जखम,कॅन्सर,रक्ताचे विकार,स्तनावरील गाठी ,ताठरपणा व कॅन्सर,मेनोपॉज (menopause) मानसिक असंतुलन ,तपासणी केली तर डॉ अहिराव यांनी अमोनिया, मधुमेह,रक्तदाब तसेच मुतखडा यावर दुर्बीद्वारे उपचार,मूत्रपिंड मूत्रमार्ग विकार पौरुष ग्रंथी ( पोस्ट्रेट ग्रँथी ऑपरेशन ) पोटाचे विकार व शस्त्रक्रिया , अर्थोस्कॉपी (गुडघ्याची शस्त्रक्रिया ) न्यूमोनिया, दमा,व फुफुस आजारांवरील उपचार तसेच इतर विविध आजारांच्या उत्तमरीत्या तपासण्या करत रुग्णांना विविध आजारांवर मोलाचे मार्गदर्शन केले.
सदरच्या आयोजित कार्यक्रम व मोफत आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी लायन्सक्लब चे पदाधिकारी व तक्षशिला बौद्ध विकास संघ सांगडेच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment