ध्येय मोठे ठेवले तर माणूस मोठा होऊ शकतो:- पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर  गोवे-कोलाड ( विश्वास निकम ) आपण सत्य, शांतता, अहिंसा या प्रगतीच्या मार्गाचे पालन करत आहोत याचबरोबर आपल्यात मतभेद असतील ते बाजूला ठेऊन प्रगतीचा मार्ग कसा प्राप्त करता येईल याचे भान ठेवला पाहिजे.विविध सरकारी योजना  आहेत त्यांचा लाभ घेतला पाहिजे. पोलिस भरतीसाठी कलेक्टर साहेबांनी शनिवार,रविवार ऑनलाईन क्लासेसचे प्रशिक्षण सुरु केले आहेत त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे ध्येय मोठे ठेवले तर माणूस मोठा होऊ शकतो.१२ वी नंतर पोलिस भरती, पदवीधर नंतर युपीएससी,एमपीएससी परीक्षा देऊ शकतो.यासाठी सर्वांना सारखी संधी दिलेली आहे यात टक्केवारीची अट नाही यामुळे एकत्र येऊन जयंती साजरी केली तर स्पुर्ती मिळते असे मत सिद्धार्थ विकास संघ गोवे येथे भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पोलिसनिरीक्षक प्रमोद बाबर यांनी व्यक्त केले.

   तर नरेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आपण शिकलो, संघटित झालो परंतु आपल्याला संघर्षकुठे करायचा याचे भान राहिलेले नाही. आपण शिकल्या शिवाय उन्नती नाही. विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब यांनी समाज घडवला भगवान गौतम बुद्ध यांनी शांतीचा संदेश दिला.छत्रपती शिवाजी महाराज महिलेला सन्मान दिला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे स्त्रियांना अधिकार दिले यामुळे माझ्या सारखी एकटी महिला पुर्ण मानाने बसू शकते.नरेंद्र पवार,विलास कांबळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद गायकवाड, यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

            यावेळी प्रमोद बाबर पो.नि. रोहा,महेंद्र पोटफोडे आदर्श सरपंच,नरेंद्र जाधव विभागीय अध्यक्ष,नितीन जाधव माजी उपसरपंच,संदीप जाधव सामाजिक कार्यकर्ते, भरत कापसे,दिपक जाधव, प्रविण पवार,राजा जाधव,राजेश शिर्के,शांताराम पवार तंटामुक्ती अध्यक्ष,नामदेव जाधव गावाकमेटी अध्यक्ष, कमलाकर शिर्के खजिनदार,सुरेश जाधव पोलिस पाटील,रजनी गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्या, सुभाष वाफिळकर,सूर्यकांत कांबळे, चंद्रकांत वाटवे,चंद्रकांत कांबळे,योगेश जाधव,अनंत गायकवाड,अतुल जाधव,सिद्धार्थ गायकवाड,आण्णा पवार,पत्रकार शरद जाधव, कल्पेश पवार, यांच्यासहित असंख्य मान्यवर सिद्धार्थ विकास संघ गोवे, मुंबई येथील ग्रामस्थ, तरुण वर्ग, व असंख्य महिला वर्ग उपस्थित होत्या.

            भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या. जयंती निमित्त सकाळी ९.०० वा.बौद्ध उपासक योगेश जाधव यांच्या शुभेहस्ते ध्वजरोहन व बुद्धपूजन करण्यात आले. सकाळी ११ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, सायं.४ वा. भव्य मिरवणूक रात्री ७ वा. जाहीर सभा व रात्री १० वा. हृतिक कांबळे आणि संच मुबंई यांचा ऑर्केस्ट्रा असे सर्व कार्यक्रम विनोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक समिर गायकवाड व सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले. सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी सिद्धार्थ विकास संघ गोवे मुंबई यांचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मंडळ, तरुण वर्ग व महिला मंडळ यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog