सिद्धार्थ विकास संघ गोवे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन!

   गोवे-कोलाड (विश्वास निकम )सिद्धार्थ विकास संघ गोवे (रजि.)मुंबई यांच्या विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती शनिवार दि २१ मे २०२२ रोजी गोवे येथे विनोद शांताराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

        यानिमित्ताने सकाळी ९.००वा.बौद्ध उपासक योगेश जाधव पहूर यांच्या सुभेहस्ते ध्वजारोहण व बुद्ध पूजन,सकाळी ११ वा.सांस्कृतिक कार्यक्रम,सायंकाळी ४.०० वा.नविन बौद्धवाडी ते शिवाजी महाराज स्मारकापर्यंत भव्य मिरवणूक,रात्री ७.०० वा. जाहीर सभा रात्री ९.०० वा.हृतिक कांबळे आणि संच मुंबई यांचा ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात येणार असून यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद बाबर पो.नि. रोहा,सुभाष जाधव सहा. पो. नि. कोलाड,विकास शिंदे बौ.पं. स.रोहा तालुका अध्यक्ष,महेंद्र पोटफोडे आदर्श सरपंच गोवे,नरेंद्र जाधव विभागीय अध्यक्ष,नरेश गायकवाड सचिव युवा संघ रायगड,चंद्रकांत वाटवे अध्यक्ष शाखा पडम,सुरेश गायकवाड सर सामाजिक कार्यकर्ते,चंद्रकांत कांबळे,उपाध्यक्ष बौ.पं.स.रोहा,भावना कापसे उपसरपंच गोवे,नितीन जाधव माजी उपसरपंच गोवे,संदिप जाधव सामाजिक कार्यकर्ते,नरेंद्र पवार माजी. सरपंच,प्रविण पवार सामाजिक कार्यकर्ते,शांताराम पवार तंटामुक्ती अध्यक्ष गोवे, सुमित गायकवाड ग्रा.पं. सदस्य,रजनी गायकवाड माजी ग्रा. सदस्य गोवे हे उपस्थित राहणार आहेत.

   सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी जयंती उत्सव कमेटी अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, उपाध्यक्ष संजय गायकवाड,चिटणीस संतोष गायकवाड,उपचिटणीस सचिन गायकवाड,खजिनदार निलेश गायकवाड,उपखजिनदार मोहन गायकवाड,हिशोबतपाणीस जितेंद्र गायकवाड संदेश वाहक सुरेश गायकवाड,संदीप गायकवाड तसेच सिद्धार्थ विकास संघ गोवे, मुंबई, महिला मंडळ,तरुण वर्ग मेहनत घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog