कोलाडातील महिला असुरक्षित भरवस्तीत गळ्यातील दागिने लंपास!
कोलाड नाका (शरद जाधव)मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर भरवस्तीत एका महीलेच्या गळ्यातील दागिने लंपास करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकारामुळे सर्वत्र भितिचे वातावरण पसरले असुन कोलाड़ातील महिला असुरक्षीत असल्याची भावना नागरिक व्यक्त करित आहेत.
सविस्तर वृत असे की कोलाड़ आर डी सी बँक जवळ राहणारी महिला सुनिता यशवंत महाबळे या दुपारच्या सुमारास हळदी सभारंभातून घरी पोहचल्या. घराचा जिना चढत असताना चोरट्यांनी त्याना गाठले. व दागिने कशाला घालताय? चोरी होते हे तुम्हाला माहित आहे ना, असे म्हणताच त्या महिलेने गळ्यातील दागिने काढले. व क्षणात मोठ्या शिताफ़ीने त्या दोन चोरट्यांनी सुमारे दिड लाखाचे गळ्यातील दागिने लंपास केले.व हेल्मेट घालुन पसार झाले.
दरम्यान कोलाड़ला आता पोलिस स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला आहे.त्यामूळे या ठिकानी पोलिस टिम आहे.असे असताना चोरीच्या गुन्ह्याचा शोध लावण्यास पोलिसाना यश येत नाही.मागिल दिड वर्षात भिरा रोडवर एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरले होते, तर एका घरातूनच दागिने लंपास करण्याचा प्रकार घडला. आणि आता चक्क नाक्यासारख्या भरवस्तीत एका महिलेचे दागिने दोन चोरट्यांनी लंपास केले. मात्र चोरीचा तपास लावण्यात कोलाड़ पोलिस अपयशी ठरतात.हे अनेक गुन्ह्यात दिसून आले आहे. काल परवाच एक महिला आपल्या मुलाला घेऊन घरातून गायब झाली आहे त्याचा तपास काय हे समजू शकले नाही. एकंदरीत कोलाड़ातील महिला वर्गाचा सुरक्षीततेचा. प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या कोलाड़ला कर्तव्यदक्ष पोलिस सुभाष जाधव आहेत.त्यामूळे सर्व काही सुरळीत आहे. असे असताना सध्या महिलावर्गावर मोठे संकट आले आहे त्यामधे पोलिस चोरांच्या मुसक्या आवलंण्यात यशस्वी होतात का? याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment