रोहा तालुक्यातील भात खरेदी विक्री केंद्र बंद

नाईलाजास्थव बळीराजा भात विक्रीसाठी  घेवाऱ्याच्या दारात,

मनमानी नुसार शेकऱ्यांचा भात खरेदी,

बळीराजा संकटात!

कोलाड ( श्याम लोखंडे ) ईडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे ही म्हण सद्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी इतिहासात जमा झाली असल्याचे दिसून येत आहे एक ना अनेक संकट ही शेतकऱ्यांच्याच पाचवीला पुजली गेली आहेत शेतकरी हा आता नावापुरता बळीराजा राहिला आहे त्यामुळे राज्य सोडाच मात्र नशीबातली पीडा देखील सरता सरे ना संपूर्ण जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकऱ्याला आज मात्र अनेक संकटाला तोंड द्यावे लागत असून तालुक्यातील शासनाची भात खरेदी केंद्र बंद असल्याने नाईलाजाने बळीराजाला आपला धान घेऊन घेवाऱ्याच्या दारात विक्रीसाठी जावे लागत आहे त्यात घेवाऱ्याची मोठी मिज्जास त्याच्या मनमानी नुसार बळीराजाचा भात खरेदी करून घेत असल्याने त्यांच्यावर अधिक संकट ओढवले असल्याचे दिसून येत आहे.

देशात रायगडची नोंद भाताचे कोठार म्हणून इतिहास आहे परंतु ती इतिहास जमा झाली की काय त्यामुळे बळीराजा अक्षरशः या ना त्या कारणांनी आता मेटाकुटीला आला आहे वाढती महागाई बदलत हवामान त्यात पीक कर्जाचा भार अधिक मजुरी महागली अवजारे बी बियाणे रासायनिक खतं देखील महागली शेतात धान पिकला परंतु त्याला वेळेवर विक्री करू शकत नाही रोहा तालुक्यातील भात खरेदी केंद्र बंद असल्याने उन्हाळी भात पीक घेतलेल्या शेतकऱ्यांनी आता कोणाचे दारे थोटवायची भात खरेदी केंद्र बंद खाजगी विक्रीत पुरेसा भाव मिळत नाही तरी देखील नाईलाजाने बळीराजाला खाजगी घेवारी( मारवाडी ) यांच्या दारावर जाऊन विक्री करावी लागत आहे त्यात अधिक वाहन खर्चाचा बोजा तरी देखील त्यांचा मनमानी कारभार मनाला वाटेल तसे भाव हजार नाटके धान काळे आहे त्यात खडे आहेत तो भिजला आहे असे या ना त्या कारणाचे बारा नमुने सांगत काट्यात घट भाताला पुरेसा दर न देता मनमानी प्रमाणे शेतकऱ्यांवर अन्याय करत भात खरेदी करतात यावर नियंत्रण कोणाचे? यात खांब नाक्यावरील घेवारी मोठे माहेर असल्याचे शेतकरी गोटातून बोलले जात आहे .

भात खरेदी केंद्र बंद असल्याने उन्हाळी भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केंद्रावर भात खरेदी सुरू करण्यात यावी:-डॉ मंगेश सानप यांची मागणी 

संपूर्ण जगभरात भारत हा शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो तशी गणना देखील केली जाते परंतु याच देशात शेतकऱ्यांना मात्र संकटकाळी वेळेवर कोणतीच मदत मिळत नाही त्यांचे अश्रू कोणी पुसत नाही संपूर्ण जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे .त्यांच्यामुळे देशासह जगभरात अन्य धान्याची कमतरता कधी भासत नाही कष्टाने आणि मेहनतीने पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांवर कोरोना संकटात उपासमारीची वेळ आली तरी देखील शेतकरी डगमगला नाही त्यांनी येथून तिथून हात उसनकी करून बी बियाणे व रासायनिक खते तसेच मुजुराला वाढीव मजुरी देत भात शेती लागवड करत आज देखील तीच मजुरी त्यात अधिक महागाईची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहेच तालुक्यातील डोलवहाल सिंचनाखाली कोलाड खांब विभागातील वरसगाव, तिसे, चिंचवली,कोलाड,पुई,पुगाव,गोवे,मुठवली,शिरवली,खांब,येथील अनेक शेतकरी कालव्याच्या पाण्यावर उन्हाळी भात शेती लागवड करतात परंतु आज त्यांचे पीक देखील चांगले आहे पावसाळा डोक्यावर आहे भात खरेदी विक्री केंद्र सुरू नसल्याने येथील बळीराजाला नाईलाजाने घेवाऱ्याच्या दारात नेऊन कमी दराने भात विक्री करावी लागत आहे तसेच केंद्र बंद आहेत ते तातकाल सुरू करण्यात यावे ते बंद असल्याचा फायदा घेवारी घेत आहेत त्या घेवाऱ्यांचा मनमानी कारभारावर संबधित अधिकारी वर्गाने यावर नियंत्रण करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog